पुणे : मुकुंदनगर जैन संघातर्फे शोभायात्रा

आमदार माधुरी मिसाळ, राजेश शहा आणि सुभाष राणावत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शोभायात्रेस प्रारंभ झाला.

पुणे : मुकुंदनगर जैन संघातर्फे शोभायात्रा
मुकुंदनगर जैन संघातर्फे शोभायात्रा

देशभक्तीपर गीते, स्केटिंग, सायकलिंग आणि ढोल-ताशांच्या गजरात मुकुंदनगर जैन संघाच्या वतीने शोभायात्रा काढून अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाला अभिवादन करण्यात आले. मुकुंदनगर ते दादावाडी जैन टेंपल पर्यंत ही शोभायात्रा निघाली. 

आमदार माधुरी मिसाळ, राजेश शहा आणि सुभाष राणावत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शोभायात्रेस प्रारंभ झाला. पहिल्यांदाच भव्य शोभायात्रा निघाल्याचे दादावाडी जैन मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष ओमप्रकाश रांका यांनी यावेळी सांगितले. पाच वर्षाच्या लहान मुलाने स्वातंत्र्याचे महत्व सांगितले. तसेच, राजेश शहा यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. 

शोभायात्रेमध्ये रंगीबेरंगी सजावट केलेल्या घोडागाडी, रथ, व्हिंटेज मोटार आणि देशाची विविधता दर्शवणारी वेशभूषा परिधान करून मोठ्या संख्येने महिला आणि युवक उत्साहाने सहभागी झाले होते. सुमारे तीन हजार नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भोसरीमध्ये दुकानात शिरून महिला व्यवसायिकेची हत्या; आरोपी फरार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी