पुणे : लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सरकारकडून विविध मोहिमा राबविल्या जात आहेत. आता पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशने यासाठी ‘व्होट कर पुणेकर’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान करणाऱ्या नागरिकांना एक लिटर ऑईल खरेदीवर ५० रुपयांचे पेट्रोल मोफत दिले जाणार आहे.

पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुणेने महा एनजीओ फेडरेशन आणि इतर स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन ‘व्होट कर पुणेकर’ मोहीम हाती घेतली आहे. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले की, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि अनेक स्वयंसेवी संस्थांनी मतदार जागृतीसाठी उपक्रम राबविण्याचे आम्हाला आवाहन केले होते. त्यानुसार ही मोहीम सुरू करण्यात येत आहे. पुण्यातील पेट्रोल पंपचालक मतदान करणाऱ्या नागरिकांनी बोटावरील शाई दाखविल्यानंतर एक लिटर ऑईल खरेदीवर त्यांना ५० रुपयांचे पेट्रोल मोफत देणार आहेत. ही मोहीम २० मेपर्यंत सुरू असणार आहे.

mumbai, Mumbai municipal administration, Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, Applications fee scam, Deonar Govandi, M East Division, police complaint,
मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या अर्जासाठी शुल्क आकारणाऱ्याविरोधात कारवाईचा बडगा
panvel ,cidco, cidco shop sale scheme
पनवेल: सिडकोची ४८ भूखंड, २१८ दुकानांची सोडत, दुकान विक्री योजनेच्या ऑनलाइन नोंदणीस आजपासून सुरुवात
bmc employees on assembly election duty marathi news
मुंबई: पालिका कर्मचाऱ्यांची विधानसभा निवडणूक कामासाठी रवानगी, प्रशासकीय कामकाज, सेवासुविधांवर परिणाम होणार
Counseling Schedule Soon Ministry of Health Disclosure for NeetUG
समुपदेशनाचे वेळापत्रक लवकरच; ‘नीटयूजी’साठी आरोग्य मंत्रालयाचा खुलासा
corruption, tender approval,
निविदा मंजुरीसाठी भ्रष्टाचाराला खतपाणी! पूर्व प्रशिक्षण देणाऱ्या संस्था निवडीसाठी मागितली लाच
maharashtra assembly budget ajit pawar to announce free electricity for farmers in budget
शेतकऱ्यांसाठी मोफत वीज; साडेआठ लाख सौर कृषीपंप देण्याची घोषणा
Kalyan Dombivli Municipality, Kalyan Dombivli Municipality take action on Illegal Beer Bars and Liquor Shops, Mandatory kdmc Approval for New Licenses liquor shops, Kalyan Dombivli Municipality,
कल्याण- डोंबिवलीत बीअरबार, मद्य विक्रीचे परवाने देण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक; आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची माहिती
BCA BBA BBM BMS CET result declared Mumbai
बीसीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस सीईटीचा निकाल जाहीर

हेही वाचा…मोदी भारताचे हिटलर, अमित शहा गोबेल्स… पुण्यात कोणी केली टीका?

याचबरोबर असोसिएशन घरोघरी जाऊन मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती करणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठीही मदत केली जाणार आहे. याचबरोबर मतदानादिवशी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना २० हजार पाण्याच्या बाटल्या वितरित केल्या जाणार आहेत, असे रुपारेल यांनी सांगितले.

या मोहिमेची घोषणा असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात करण्यात आली. हा कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंगचे राजय शास्तारे, पांडुरंग शेळके, महा एनजीओ फेडरेशनचे शेखर मुंदडा आणि पीसीपीआरचे मनोज पोचट उपस्थित होते. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे सातशे साधक उपस्थित होते.

हेही वाचा…..तर मला मत मागताना शरम वाटली असती, अजित पवार असे का म्हणाले?

मतदान केंद्र शोधण्याची सुविधा

‘व्होट कर पुणेकर’ या मोहिमेसाठी मोबाईल उपयोजन आणि http://www.votekarpunekar.com हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. त्यावर जाऊन मतदार आपले मतदान केंद्र शोधू शकतील. तसेच क्यूआर कोड स्कॅन करूनही मतदार मतदान केंद्राचा शोध घेऊ शकणार आहेत.