scorecardresearch

पुणे: चिठ्ठी ठरली ‘लकी’!; स्वीकृत नगरसेवकपदी काँग्रेसचे अजित दरेकर

२४ तारखेला अधिकृत घोषणा

पुणे: चिठ्ठी ठरली ‘लकी’!; स्वीकृत नगरसेवकपदी काँग्रेसचे अजित दरेकर
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पुण्यातील काँग्रेसचे नेते अजित दरेकर यांच्यासाठी चिठ्ठी ‘लकी’ ठरली आहे. महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी दरेकर यांची चिठ्ठीद्वारे निवड झाली आहे. शिवसेनेकडून योगेश मोकाटे यांना तर काँग्रेसकडून अजित दरेकर यांना उमेदवारी दिली होती. दोघांपैकी एकाची आज चिठ्ठीद्वारे निवड केली जाणार होती. निवडणुकीसाठी चिठ्ठी काढण्यात आली. त्यात दरेकर यांना स्वीकृत सदस्यपदाची ‘लॉटरी’ लागली. येत्या २४ तारखेला त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

पुणे महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदाच्या निवडणुकीत संख्याबळ लक्षात घेता भाजप ३, राष्ट्रवादी १ आणि शिवसेना-काँग्रेसच्या दोन उमेदवारांपैकी एका उमेदवाराची आज चिठ्ठीद्वारे निवड केली जाणार होती. स्वीकृत सदस्यपदासाठी काँग्रेसकडून अजित दरेकर आणि शिवसेनेकडून योगेश मोकाटे यांना उमेदवारी दिली होती. दोघांपैकी कुणाला लॉटरी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. आज सकाळी ११ वाजता महापालिका आयुक्तांच्या दालनात निवडणूक घेण्यात आली. यावेळी राजेंद्र जगताप, नगरसचिव सुनील पारखी आणि उमेदवारांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थीनीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये काँग्रेस पक्षाचे अजित दरेकर विजयी झाले.
भाजपकडून गणेश बिडकर, रघुनाथ गौडा आणि गोपाल चिंतल यांनी कालच अर्ज सादर केले आहेत. राष्ट्रवादीकडून सुभाष जगताप आणि रुपाली चाकणकर यांनी अर्ज भरला आहे. चाकणकर यांना अर्ज दाखल करण्यास उशीर झाल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. यामुळे सुभाष जगताप यांची निवड निश्चित झाली आहे. तर आज अजित दरेकर यांची निवड झाली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-04-2017 at 14:01 IST

संबंधित बातम्या