पुणे : अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या एकास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. सूरज नाना कदम (वय २३, रा. कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडीत मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलगी कदमच्या ओळखीतील आहे. त्याने मुलीला आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर तपास करत आहेत.