जळगाव येथील बहुचर्चित भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बी.एच.आर. पतसंस्थेतील अवसायकाच्या काळातील घोटाळ्याप्रकरणी फरार असलेला मुख्य संशयित सुनील झंवरला (रा. जळगाव) अखेर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून पुणे पोलीस सुनील झंवरचा शोध घेत होते. अखेर नऊ महिन्यानंतर नाशिकमधून पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुनील झंवरला अटक केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून त्याला पुण्यास नेण्यात आले.

धुम्रपानामुळे अडकला जाळ्यात

सुनील झंवर वेशांतर करुन जळगाव, मुंबई, राजस्थान आणि इंदूर येथे फिरत होता. नऊ महिन्यांपासून पुणे पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. तो नाशिकमध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाल्यानंतर पथकाने त्याला त्याला अटक करण्यासाठी सापळा रचला होता.

Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

BHR Scam : मुख्य आरोपी जिंतेद्र कंडारेला बेड्या; वेषांतर करून लपला होता वसतिगृहात

गुन्हा दाखल असल्यापासून फरार झालेला सुनील झंवरचा पोलिसांना सुगावा लागलेला होता. अहमदाबाद त्यांनतर उज्जैन आणि सोमवारी रात्री नाशिकमध्ये तो पोहचला. नाशिकला पोहोचल्याची खबरदेखील पोलिसांना मिळाली होती. सोमवारी रात्रीपासूनच पोलिसांनी घरावर नजर ठेवली होती. याचवेळी धुमप्रान करण्यासाठी सुनील झंवर गॅलरीत आला आणि पोलिसांनी त्याला पाहिलं. त्याचे गपचूप फोटो काढून झंवरच असल्याचे खात्री झाल्यानतंर पोलिस पथकाने त्यांच्यावर झडप घातली. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता पोलिसांनी त्याला अटक केली.

काय आहे प्रकरण –

जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचा घोटाळा राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या संदर्भात राज्यातून तक्रोरी समोर येत असतांना पुण्याच्या डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त शिक्षिका तथा ठेवीदार रंजना घोरपडे यांनी तक्रार दाखल केली. त्यांची १७ लाख ८ हजार ७४२ रुपयांची फसवणूक झाली होती. पोलीस चौकशीत बीएचआर पतसंस्थेत ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले. या गुन्ह्यतील मुख्य सूत्रधार आणि अवसायक जितेंद्र कंडारे यास सात महिन्यानंतर २९ जून २०२१ रोजी इंदूर येथून अटक करण्यात आली होती. झंवर आणि कंडारे या दोघांना न्यायालयाने फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. जिल्हा आणि उच्च न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.