पुण्यात घरफोडी आणि चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद

८ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Pune police , Crime , robber , Loksatta, Loksatta news, marathi, Marathi news
Pune police : तपासात त्याने पिंपरी परिसरात पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून २९ तोळे सोन्याचे दागीने, एक एचटीसी कंपनीचा मोबाईल व एक टॅब असे एकूण ८ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोड्या करणाऱ्या एका सराईत आरोपीला पोलिसांनी मोशी येथून अटक केली आहे .त्याच्याकडून ८ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी पिंपरीतील एका सदनिकेचे कुलूप तोडून २ लाख ६० हजार रुपये लंपास केल्याची फिर्याद पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यावरुन पोलिसांनी तपास सुरु केला असता. पोलिसांना खबऱ्यामार्फत विठ्ठल ठाकूर नामक व्यक्तीने घरफोडी केल्याची माहिती मिळाली.

त्याच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला मोशी टोलनाका येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात त्याने पिंपरी परिसरात पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून २९ तोळे सोन्याचे दागिने, एक एचटीसी कंपनीचा मोबाईल व एक टॅब असे एकूण ८ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच या आरोपीने आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पिंपरी पोलीस करत आहेत. सदर कामगिरी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे,सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडुरके,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर,गुन्हे पोलीस निरीक्षक मसाजी काळे,यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनिवास कामूने,हरीश माने,राजेंद्र भोसले यांनी हि कारवाई केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pune police arrest expret robber