थेऊर परिसरात घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले. चोरट्यांकडून तीक्ष्ण शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. अंधारात चोरट्यांचे साथीदार पसार झाले असून चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.
हेही वाचा >>> पुणे : हडपसर भागात भरधाव ट्रकच्या धडकेने दोघांचा मृत्यू, अपघातानंतर ट्रक चालक पसार
अक्षय उर्फ आकाश उर्फ ओंकार धनाजी सोनवणे (वय २०), प्रसाद धनाजी सोनवणे (वय १९), आदित्य गणेश सावंत (वय २०), पारस श्रीकांत कांबळे (वय २५, सर्व रा. थेऊर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पोलीस नाईक विशाल बनकर यांनी याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सोनवणे आणि साथीदार थेऊर गावात दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून सोनवणे, सावंत, कांबळे यांना पकडले. अंधारात चोरट्यांचे चार साथीदार पसार झाले. चोरट्यांकडून तीक्ष्ण शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत.