लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंडळ म्हणजेच दहावी तसेच वेगवेगळ्या पदवी अभ्यासक्रमाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्याची विक्री करणारी टोळी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणली आहे. या प्रकरणात तपास पथकाने रायगड जिल्ह्यातील रोहा येथून जगदीश रमेश पाठक (वय ३३) या दलालाला अटक केली आहे. या पोलीस तपासामध्ये पाठक याने ३० जणांना पैसे घेऊन वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या शाखेची प्रमाणपत्रे वाटप केल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपी जगदीश पाठक हा रोहा रायगड परिसरात दलाल म्हणून काम बघत होता. छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य आरोपी इम्रान सय्यद याच्या संपर्कात राहून विविध शाखांचे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्याची विक्री तो करत होता. याबाबत आरोपीवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हेही वाचा… १२१ भाषांमध्ये १२१ गाण्यांचे सलग साडेतेरा तास सादरीकरण…मंजुश्री ओक यांच्या विक्रमाची ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद

आरोपीस न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police arrested a broker for selling fake certificates pune print news vvk 10 dvr
First published on: 01-06-2023 at 16:20 IST