पुणे : पादचाऱ्यांना धमकावून लुटमार करणाऱ्या चोरट्यां विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओंकार विनोद मासाळ उर्फ अर्शद सलीम शेख (वय २२, रा. जुना बाजार, मंगळवार पेठ) आणि आशिष उर्फ गुड्डू रवींद्र चव्हाण (वय २३, रा. रामटेकडी, हडपसर) अशी मोक्का कारवाई केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. मासाळ आणि चव्हाण यांनी हडपसर भागात एकाच रात्री नऊ जणांना लुटले होते. त्यांच्याकडील मोबाइल संच आणि रोकड असा ऐवज लुटला होता. दोघांनी वेगवेगळ्या घटनात पादचारी तसेच दुचाकीस्वारांना शस्त्राचा धाक दाखवून लुटमार केली होती. या प्रकरणाचा तपास करुन हडपसर पोलिसांनी दोघांना अटक केली होती.

दोघां विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, दिगंबर शिंदे, विश्वास डगळे, उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांनी तयार केला होता. या प्रस्तावाची अतिरिक्त पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण आणि उपायुक्त नम्रता पाटील यांनी पडताळणी केली. त्यानंतर दोघां विरोधात मोक्का कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले.

दीड वर्षात शहरातील ८० टोळ्यांवर मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील गुंड टोळ्यांना जरब बसविण्यासाठी मोक्का कायद्याचा वापर करून शहरातील ८० गुंड टोळ्यांतील सराइतांन गजाआड केले आहे. मोक्का कारवाईमुळे गुंड टोळ्यांना जरब बसली असून यंदाच्या वर्षी १७ गुंड टोळ्यां विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police chief ordered action under mocca against thieves who threaten and loot pedestrians pune print news zws
First published on: 26-05-2022 at 15:50 IST