पुणे : शहरातील सराइतांची चौकशी (कोम्बिंग ऑपरेशन ) सुरू असल्याची पत्नीकडे बतावणी करुन मैत्रिणीसोबत पबमध्ये पार्टी करणाऱ्या पोलीस हवालदाराला निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त डाॅ. सागर कवडे यांनी दिले.

हनुमंत गुलाब कांबळे (रा. पीर वस्ती, खडकी) असे निलंबित केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याबाबत कांबळे याच्या पत्नीने कौटुंबिक छळ केल्याप्रकरणी हडपसर येथील काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार कांबळेसह त्याच्या मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस हवालदारा कांबळे याचे एका तरुणीशी अनैतिक संबंध होते. हे संबध त्याने पत्नीपासून लपवू न ठेवले होते. त्याने पत्नीला मारहाणही केली होती. घरातून हाकलून देऊन घटस्फोट देण्याची धमकी दिली होती. कांबळे याच्या मैत्रिणीने फिर्यादी पत्नीला मारहाण केली होती, असे पत्नीने फिर्यादीत म्हटले होते.

गेल्या वर्षी १५ जून रोजी कांबळे याला पत्नीने दूरध्वनी केला. तेव्हा रात्रपाळीत काॅम्बिंग ऑपरेशन करण्यात असल्याची बतावणी त्याने पत्नीकडे केली हाेती. मात्र, कांबळे हा पिंपरी-चिंचवडमधील एका पबमध्ये मैत्रिणीसोबत दारू पित होत होता. पत्नी पबमध्ये गेली. तेव्हा ‘मी पोलीस आहे. तू माझ्याविरुद्ध तक्रार करू शकत नाही’, अशी धमकी त्याने पत्नीला दिली होती. अखेर त्याच्या छळामुळे पत्नीने पोलिसंकडे तक्रार दिली. कांबळे याच्या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे, असा ठपका ठेऊन पोलीस उपायुक्त डाॅ. सागर कवडे यांनी त्यााला पोलीस दलातून निलंबित केले.

लाचखोर पोलीस हवालदार निलंबित

वाॅरंट न बजाविण्यासाटी एकाकडून दीड लाख रुपयांची लाच घेणाऱ्या कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारला परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी निलंबिित केले. हैद्राबाद येथील न्यायालयाने धनादेश न वटल्याप्रकरणी एका खासगी कंपनीच्या मालकावािरुद्ध अटक वाॅरंट बजाविले होते. हे वाॅरंट न बजाविण्यासाठी पोलीस हवालदार गणेश कस्पटे यांनी खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याकडे दीड लाख रुपयांची लाच मागितील होती. यापूर्वी कस्पटे यांना पाचा लाख रुपये देण्यात आले होते. त्यानंतर त्याने पुन्हा पैशांची मागणी केली. बुधवारी (६ मे) कोरेगाव पार्क भागात तक्रारदाराकडून लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कस्पटे याला सापळा लावून पकडले. पोलिसांनी त्यांना या प्रकणात अटक केली होती. कस्पटे हे शासकीय कर्मचारी आहेत. त्यांच्या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे, असा ठपका ठेवण्यात आला. कस्पटे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले.