पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाविरुद्ध सज्ञान समजून त्याच्याविरुद्ध खटला चालविण्याची मागणी करणारा अर्ज पोलिसांनी बाल न्याय मंडळात (जेजीबी) दाखल केला आहे. अपघातातील मोटार आणि मुलाचे पारपत्र परत मिळावे, म्हणून अगरवाल कुटुंबीयांनी अर्ज केला आहे. पुणे पोलीस, तसेच अगरवाल कुटुंबीयांच्या अर्जावर २६ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

मुलाला सज्ञान ठरवून खटला चालवायचा असेल तर पोलिसांनी मुलाला बाल न्याय मंडळात हजर केल्यापासून ३० दिवसांत तपास अहवाल (आरोपपत्र) दाखल करणे बंधनकारक आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांनी वेळेत अहवाल सादर न केल्याने मुलाला जामीन मंजूर झाला. अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात बदल केल्याप्रकरणी त्याचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल, आई शिवानी, ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, तसेच साथीदार येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

Municipal Corporation employees instructed to gather feedback before closing citizen complaints on PMC Care App
तक्रारदाराची तक्रार बंद करताना पुणे महापालिकेचा मोठा निर्णय
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Badlapur case, school trustees Badlapur case,
बदलापूर प्रकरण : …तर शाळेच्या विश्वस्तांना अद्याप का शोधू शकला नाहीत ? उच्च न्यायालयाचा पोलिसांना संतप्त प्रश्न
cops molested young lady attempted kidnapping two vasai policemen suspended
पोलिसांकडूनच तरुणीचा विनयभंग, अपहरणाचा प्रयत्न; नागरिकांनी पोलिसांना चोपले, वसईतील दोन पोलीस निलंबित
dr ajit ranade continues as gokhale institute vc till october 7 bombay hc
डॉ. अजित रानडे हे ७ ऑक्टोबरपर्यंत कुलगुरूपदी कायम; उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
online rummy, High Court, State Govt,
ऑनलाईन रमी हा खेळ संधीचा की कौशल्याचा भाग ? राज्य सरकाला भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
mcoca action against NK gang leader and accomplices in Yerwada
येरवड्यातील एन.के. गँगच्या म्होरक्यासह साथीदारांवर मोक्का कारवाई
navi mumbai police registered case under pocso act against youth for child sexual abuse
नवी मुंबई : बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा

हेही वाचा..एसटीची डिझेलवरील वाहने ‘एलएनजी’मध्ये रूपांतरित करण्याचा घाट

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी भरधाव मोटारीने संगणक अभियंता तरुण-तरुणीला धडक दिली. अपघातात दोघांचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणात पोलिासांनी जप्त केलेली मोटार परत मिळवण्यासाठी अगरवाल कुटुंबीयांनी न्यायालयात अर्ज केला आहे. मुलाचे पारपत्र पोलिसांनी जप्त केले आहे. पारपत्र परत मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. या अर्जावर बुधवारी (२८ ऑगस्ट) न्यायालयात सुनावणी होणार होती. सुनावणी पुढे ढकलण्यात आली. पुणे पोलीस आणि अगरवाल कुटुंबीयांच्या अर्जावर २६ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.