सासरच्या लोकांनी मासिक पाळीतील रक्त विकण्यासाठी पुण्यातील एका महिलेचा छळ केल्याचं प्रकरण उघड झालं. यानंतर एकच खळबळ उडाली. राज्यभरात या घटनेची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी या प्रकरणात नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती दिली आहे. तसेच दिराने मासिक पाळीतील रक्त विकून ५० हजार रुपये मिळणार असल्याने हा छळ केल्याचंही नमूद केलं. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी शुक्रवारी (१० मार्च) एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

पोलीस म्हणाले, “एका २७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. ती विश्रांतवाडीतील रहिवासी आहे. २०१९ मध्ये तिचं लग्न झालं. लग्नानंतर ती पुण्यातील चंदननगर-फुरसुंगी येथे राहत होती. त्यावेळी सासरी सासू-सासरे, नवरा यांनी तिला त्रास दिला. यानंतर तिने नवरा आणि सासू-सासऱ्यांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली होती.”

With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
millions of old vehicles running on pune road no re registration after fifteen years
पुण्यातील रस्त्यावर लाखभर जुनी वाहने! पंधरा वर्षे होऊनही पुनर्नोंदणी नाही
complainant get back rs 3 5 lakh duped by online fraud with the help of kashimira police
वसई: ऑनलाईन फसवणुकीतील सव्वा तीन लाख रुपये मिळवून दिले, काशिमिरा पोलिसांनी तत्पर कारवाई

“पोलीस तक्रारीनंतर सासरच्या लोकांनी तिची समजूत काढली आणि २०२१ मध्ये तिला नांदवण्यासाठी बीड जिल्ह्यातील मूळ गावी नेले. २०२२ मध्ये महिलेचे पती कामानिमित्त बाहेर गेले असताना तिच्या दिराने तिच्याकडे मासिक पाळीतील रक्ताची मागणी केली. ही विचित्र गोष्ट ऐकल्यानंतर या महिलेने या असल्या गोष्टी माझ्याकडे कशा मागू शकता, अशी विचारणा केली,” अशी माहिती पोलिसांनी दिली.

“मासिक पाळीचं रक्त विकून मिळणार होते ५० हजार रुपये”

पोलीस पुढे म्हणाले, “पीडित महिलेने दिराला जे हवं ते तुमच्या पत्नीकडून घ्या असं सांगितलं. यावर दिराने सांगितलं की, ज्या महिलेला मुलबाळ झालेलं नाही त्याच महिलेच्या मासिक पाळीतील रक्ताची गरज आहे. ते रक्त विकून त्याला त्याचे ५० हजार रुपये मिळणार होते. यानुसार महिलेच्या ईच्छेविरुद्ध दिर, मावस दिर, भाचा आणि शेजारी राहणारा एक व्यक्ती यांनी मिळून महिलेची मासिक पाळी असताना तिचं रक्त काढलं.”

“पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, कलम ३७७, कौटुंबिक त्रासासाठी कलम ४९८ आणि अघोरी कृत्य केल्याप्रकरणी त्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असं पोलिसांनी सांगितलं.

“अडीच वर्षे हलपाटे मारूनही गुन्हा दाखल केला नाही”

अडीच वर्षांपासून सातत्याने पोलिसांकडे हलपाटे मारले. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही, अशी पीडित महिलेची तक्रार होती. याबाबत विचारलं असता पोलीस म्हणाले, “पीडित महिला ज्या दिवशी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला आली त्याचदिवशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदाचित बीडमध्ये सासरी स्थानिक पोलिसांकडे गेली असावी. याबाबत आम्हाला अधिक माहिती नाही.”

हेही वाचा : VIDEO: सासरच्यांनी सुनेचे हातपाय बांधून मासिक पाळीचं रक्त विकलं, चंद्रकांत पाटील म्हणाले, “भयंकर…”

“हा गुन्हा बीडमध्ये घडला आहे. त्यामुळे आम्ही हा गुन्हा दाखल करून घेऊन याचे कागदपत्र बीड पोलिसांकडे तपासासाठी पाठवले आहेत. अद्याप या प्रकरणी कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.