scorecardresearch

पुणे : पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलीस भरती स्थगित

कसबा पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलीस भरती प्रक्रिया १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत स्थगित करण्यात आली आहे

Police
(संग्रहित छायाचित्र)

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पुणे पोलीस दलातील पोलीस भरती २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. पुणे पोलीस दलातील पोलीस शिपाई, चालक पदासाठी भरती प्रक्रिया शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात ३ जानेवारीपासून सुरू झाली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलीस भरती प्रक्रिया १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस मुख्यालयाचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

हेही वाचा- ‘अपंगांसाठी राज्यात स्वतंत्र विद्यापीठ’; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक घेण्यात येईल. भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अनुक्रमे कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या विधानसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. याच जागांवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. तर २ मार्च रोजी मतमोजणी होईल.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 22:03 IST