पुणे : पालखी सोहळ्यात दिंडीसोबत आलेली महिला वाट चुकली. वाट चुकल्याने घाबरलेल्या महिलेला पोलिसांनी पाहिले. तिची विचारपूस केल्यानंतर ती वाट चुकल्याचे लक्षात आले. त्यानंतर मार्केट यार्ड पोलिसांनी तातडीने दिंडीचा शोध घेऊन वाट चुकलेल्या महिलेला मदत केले.

पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंड्या शहर, तसेच उपनगरातील विविध भागात मुक्कामी येतात. मार्केट यार्ड भागात आलेल्या दिंडीतील महिला वाट चुकली. मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील आणि गस्त घालत होते. पोलिसांनी घाबरलेल्या महिलेला पाहिले. त्यांनी विचारपूस केली. तेव्हा महिलेकडे दिंडीप्रमुखांचा मोबाइल क्रमांक नसल्याचे लक्षात आले. पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा महिला मूळची रायगड जिल्ह्यातील उरणची रहिवासी असल्याची समजले. त्यानंतर पोलीस निरीक्षक पाटील यांनी उरण पोलिसांशी संपर्क साधला.

उरणमधून पुण्यात आलेल्या दिंडीप्रमुखांची माहिती आणि मोबाइल क्रमांक मिळवले. त्यानंतर पोलिसांनी दिंडीप्रमुखांशी संपर्क साधला. दिंडी मार्केट यार्ड परिसरात होती. दिंडीप्रमुख पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी महिलेला दिंडीप्रमुखांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी महिलेला त्वरीत मदत केल्याने दिंडीप्रमुखांनी आभार मानले.

पालखी सोहळ्यात महिलांकडील दागिने लांबविले

पालखी सोहळ्यात दर्शन घेणाऱ्या महिलांकडील दागिने लांबविण्यात आल्याची घटना मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी चौक आणि खडकी परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका ६८ वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बोपोडी चौकात श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. दर्शनासाठी गर्दी झाली होती. गर्दीत पालखीचे दर्शन घेणारया महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले. पालखी सोहळ्यात आणखी एका महिलेचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. पालखी सोहळ्यात महिलांकडील दागिने लांबविण्याच्या घटना घडतात. यापार्श्वभूमीवर पोलिसंनी साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त पालखी मार्गावर तैनात केला होता.

मोबाइल चोरटे अटकेत

दिडीतील वारकऱ्यांचे मोबाइल संच लांबविणाऱ्या चोरट्यांना मार्केट यार्ड पोलिसांनी अटक केली. प्रकाश देवराम परिहार (वय २९, रा. लाेहियानगर), मोहम्मद मनान जमाल शेख (वय २५, रा. मार्केट यार्ड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मार्केट यार्डातील श्री शारदा गजानन मंदिराजवळ दिंडी आली होती. दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांचे मोबाइल संच परिहार आणि शेख यांनी लांबविले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गस्त घालणाऱ्या मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मनीषा पाटील, गुन्हे शाखेच्या निरीक्षक सुनीता नवले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने शेख आणि परिहार यांना पकडले. त्यांच्याकडून दोन मोबाइल संच जप्त करण्यात आले.