शहरात कोयता गँगने माजविलेल्या दहशतीमुळे पोलिसांनी आता कोयता विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आदेश दिले आहेत. कोयता खरेदी करणाऱ्या नागरिकांकडून आधारकार्ड घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. कोयता खरेदी करणाऱ्याचे नाव आणि पत्ता नोंदवून घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>>Kasba Chinchwad by-election: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूकीमध्ये आता ‘आप’ची एन्ट्री

High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण

शहरात किरकोळ वादातून कोयते उगारुन दहशत माजविण्याच्या घटना घडल्या आहेत. दाेन दिवसांपूर्वी अप्पा बळवंत चौकात टोळक्याने किरकोळ वादातून एका महाविद्यालयीन युवकावर कोयत्याने वार केले होते. या प्रकरणात अल्पवयीन मुलांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शहरातील बोहरी आळी परिसरात गुन्हे शाखेने कारवाई करुन १३५ कोयते जप्त केले होते. अल्पवयीन मुलांना सहज कोयते उपलब्ध होत असल्याने पोलिसांनी कोयता खरेदीसाठी आलेल्या नागरिकांकडून आधारकार्ड घ्यावे तसेच त्याचे नाव आणि पत्ता नोंदवून घ्यावा, असे आदेश दिले आहेत.