पुणे : शिकवणीवरुन घरी निघालेल्या दहा वर्षांच्या शाळकरी मुलीशी पुणे ग्रामीण पोलीस दलातील पाेलीस कर्मचाऱ्याने अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध नारायणगाव पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायण भाऊसाहेब बर्डे (वय ३८, रा. आकाशगंगा काॅलनी, आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. नारायणगाव भागातील दहा वर्षांची मुलगी शिकवणीवरुन घरी निघाली होती. त्यावेळी ओतूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नारायण बर्डे याने तिचा पाठलाग करुन अडवले. कोल्हेमळा रस्त्यावर मुलीला गाडीवर बसण्यास सांगितले. तिला शंभर रुपये देतो, असे सांगून अश्लील वर्तन केले. त्यानंतर घाबरलेली मुलगी घरी गेली. तिने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा >>> हिंजवडीत महिलेच्या प्रियकराचा खून; मृतदेह मुळशी धरणात टाकला; पती अटकेत

त्यानंतर मुलीच्या पालकांनी शोध घेण्यास सुरुवात केली. बर्डेला काही अंतरावर पकडले. त्याला नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. बर्डेविरुद्ध बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये (पोक्सो), तसेच विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. बर्डेविरुद्ध पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कडक कारवाई करावी. त्याला पोलीस दलातून निलंबित करावे अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल. पोलीस नागरिकांचे रक्षक आहेत, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे तपास करत आहेत.

Story img Loader