पुणे : कल्याणीनगरमधील अपघातातील पोर्श मोटार विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याची बाब उघड झाली आहे. यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) विनानोंदणी रस्त्यावर धावत असलेल्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. अशी वाहने आढळल्यास त्याची विक्री करणाऱ्या वितरकाचा व्यवसाय परवाना निलंबित करण्याचे पाऊल आरटीओने उचलले आहे.

कल्याणीनगरमधील अपघातातील पोर्श मोटारीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आरटीओतील वाहननोंदणीच्या प्रक्रियेबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आरटीओने शहरातील रस्त्यांवर धावणाऱ्या विनानोंदणी वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आरटीओच्या भरारी पथकांकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

voter ID card found on the Road
डोंबिवलीत रस्त्यावर सापडलेल्या मतदार ओळखपत्रप्रकरणी ‘बीएलओ’ अधिकाऱ्यांवर गुन्हा
kalyan shilphata road marathi news
मेट्रोच्या कामांमुळे शिळफाटा रस्त्यावरील अवजड वाहने पर्यायी रस्त्यावरून वळविण्याच्या हालचाली
Alandi, boy, car, Pimpri,
पिंपरी : कल्याणीनगर अपघात प्रकरणाची आळंदीत पुनरावृत्ती; अल्पवयीन मुलाने भरधाव मोटार अंगावर घातल्याने महिला जखमी
Traffic jam due to beam collapse in Airoli
ऐरोलीत तुळई कोसळल्याने वाहतूक कोंडी
thane, Park under Nitin Company Bridge, Nitin Company Bridge Park, thane municipal corporation, park under nitin company turn into dumping ground, thane news, marathi news,
ठाणे : नितीन कंपनी पूलाखालील उद्यान आता कचराभूमी, चालण्यासाठी उद्यानात येणारे नागरिक हैराण
शिवडीतील मतमोजणी केंद्र परिसरात सर्प दर्शन; सर्पमित्रांच्या मदतीने १२ सापांची सुरक्षीतस्थळी हलवले, त्यानंतर पार पडली मतमोजणी
speeding truck crushed young man putting up posters one dead
वर्धा : भरधाव ट्रकने पोस्टर लावणाऱ्या युवकांना चिरडले; एक ठार, दोन गंभीर
Mumbai girl suicide marathi news
मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीने १० व्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवलं, मंत्रालयासमोरची घटना

हेही वाचा >>>१२वीचा निकाल ९३.३७ टक्के; कोकण पुन्हा अव्वल, मुंबई सर्वांत मागे,सव्वातेरा लाख विद्यार्थी उत्तीर्ण

शहरातील रस्त्यावर विनानोंदणी वाहन दिसल्यास कारवाई केली जात आहे. ही कारवाई वाहनाची विक्री करणाऱ्या वितरकावर केली जात आहे. वितरकांना याबाबत आरटीओने सूचनाही दिल्या आहेत. वितरकाने विनानोंदणी वाहन ग्राहकाला देऊ नये, असेही बजावण्यात आले आहे. विनानोंदणी वाहन दिसल्यास वितरकांना व्यवसाय परवाना निलंबित केला जाणार आहे. हा परवाना १५ दिवसांपासून ६ महिन्यांच्या कालावधीपर्यंत निलंबित केला जाणार आहे.

शहरातील वितरकांना विनानोंदणी वाहन ग्राहकांना देऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तरीही विनानोंदणी वाहन रस्त्यावर दिसल्यास संबंधित वितरकाचा परवाना निलंबित केला जाणार आहे.- संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी

विनानोंदणी वाहनांची आकडेवारीच नाही

शहरात विनानोंदणी किती वाहने आहेत याची आकडेवारी आरटीओकडे सध्या उपलब्ध नसल्याची बाबही उघड झाली आहे. वाहनाच्या नोंदणीची जबाबदारी विक्रीवेळी वितरकावर असते. वाहन इतर राज्यांतून आणले असल्यास तेथील वितरक तात्पुरती नोंदणी करून वाहन पाठवतो. त्यानंतर संबंधित आरटीओत नोंदणी करण्याची जबाबदारी वाहनमालकाची असते. शहरात अशा प्रकारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण न झालेली किती वाहने धावत आहेत, याची माहिती आरटीओकडेही नाही.