पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या रक्तनमुन्यात बदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने मंगळवारी दोघांना अटक केली. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालने आरोपींच्या मार्फत ससूनमधील डॉक्टरला या दोघांनी पैसे पोहोचविल्याचे समोर आले आहे. अश्फाक बाशा इनामदार (वय ३६, रा. धानोरी, विश्रांतवाडी), अमर संतोष गायकवाड (वय २७, रा. सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अल्पवयीन मुलाच्या रक्तनमुन्यातील बदल केल्याप्रकरणी यापूर्वी ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागातील डाॅ. अजय तावरे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक केली होती. मुलाच्या रक्तनमुन्यात बदल करण्यासाठी अगरवालने डाॅ. तावरे यांना पैसे दिले होते.

हेही वाचा >>> Pune Lok Sabha Election Results 2024 : माझा विजय गिरीश बापट यांना समर्पित! मुरलीधर मोहोळ यांची भावना

Kalyan, signal malfunction, Central Railway, service disruption, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Kasara, Karjat, local trains, commuter chaos, railway stations, passengers, Dombivli, rain, road traffic, transportation, thane news, marathi news, kalyan news, Central railway news, loksatta news,
कल्याणमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत, कामाच्या पहिल्याच दिवशी लोकलचा गोंधळ असल्याने प्रवासी संतप्त
BJP state executive meeting, Balewadi, pune, police force deployed
भाजप कार्यकारिणीच्या बैठकीसाठी एक हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त, बालेवाडीत आज बैठक
heart transplant surgery at kem hospital
केईएम रुग्णालयात पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी, केईएम ठरले देशातील एकमेव महानगरपालिका रुग्णालय
The High Court gave a clear order to the Divisional Commissioners and District Collectors to use government shakti and privilege to pave the way for VNIT
‘व्हीएनआयटी’ ऐकत नसेल तर रस्ता सुरू  करण्यासाठी ‘शक्ती’ वापरा ,उच्च न्यायालयाचे आदेश…
fire, slipper , factory,
वसईच्या चिंचोटी येथे चप्पल तयार करणाऱ्या  कारखान्यात भीषण आग, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू
Palghar Worker Fatally Stabbed, Altercation, tarapur BARC, INRP Construction Site, Security Concerns, palghar news,
तारापूर बीएआरसी केंद्राच्या परिसरात खून करण्याचा प्रयत्न, स्थानिक कंत्राटी कामगार गंभीर
Careers And Jobs After Liberal Arts Degree
चौकट मोडताना : परदेशी जाण्याचा खर्चिक मार्ग
oxygen Scam in Corona Give permission for the action of employees after considering everything says HC
करोना काळातील प्राणवायू प्रकल्प घोटाळा : सारासार विचार करून कर्मचाऱ्यांवीर कारवाईसाठी मंजुरी द्या, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

अगरवालने डाॅ. तावरे यांना कोणामार्फत पैसे दिले, याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू होता. तपासात अगरवालने अश्फाक आणि अमर यांच्याशी संपर्क साधून डाॅ. तावरे यांना पैसे दिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पसार झालेल्या अश्फाक आणि अमर यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

हेही वाचा >>> तरुणीचा खून करून प्रियकराची आत्महत्या; हडपसर भागातील हॉटेलमधील घटना; नातेसंबंधातील प्रेमप्रकरणाला विरोध झाल्याने टोकाचे पाऊल

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी अपघात घडला होता. भरधाव मोटारीच्या धडकेत संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. मुलाने मद्यप्राशन केल्याची माहिती चौकशीत मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात आणले. ससूनमधील डाॅ. तावरे यांच्याशी अगरवालने संपर्क साधला. मुलाच्या रक्तनमुन्यात बदल करण्यासाठी त्याने डाॅ. तावरे यांना पैसे दिले होते. मुलाला वाचविण्यासाठी त्याची आई शिवानी अगरवालने रक्त दिल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर याप्रकरणी शिवानी अगरवालसह पती विशालला अटक करण्यात आली.