Pune Porsche Crash Latest Updates: पुण्यात शनिवारी पहाटे पोर्श कारने बाईकवरुन जाणाऱ्या दोघांना धडक दिली. ज्यात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या कारने या दोघांना चिरडलं. पुण्यातल्या कल्याणीनगर भागात ही घटना घडली आहे. ज्याची चर्चा अजूनही सुरु आहे. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या १७ वर्षीय मुलाने या दोघांना चिरडलं. अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया अशी दोघांची नावं आहेत. या दोघांच्या या अपघाती मृत्यूआधी काय घडलं ती माहिती आता समोर आली आहे.

अनिश आणि अश्विनी यांनी मित्रांसह डिनरला जायचं ठरवलं

अनिश आणि अश्विनी यांच्यासह त्यांच्या इतर मित्रांनी अनेक दिवस एकत्र भेट झाली नसल्याने डिनर प्लान केला आणि पबमध्ये जायचं ठरवलं. त्यामुळे आम्ही सगळे पबमध्ये गेलो होतो. कल्याणी नगर भागात रेस्तराँ होतं. आम्ही तिथेच गेलो. पुढे काय घडणार आहे ते आम्हाला माहीतही नव्हतं. आम्ही सगळे घरी परतण्यासाठी बाहेर पडलो तितक्यात डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच हा भीषण अपघात झाला. अनीश आणि अश्विनी यांचा मित्र अकीब मुल्लाने सांगितलं. माझ्या डोळ्यांसमोरून अजूनही तो प्रसंग जात नाही असंही अकीबने स्पष्ट केलं.

Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident : “ऑनलाईन बिलांवरून स्पष्ट झालंय की…”, ‘त्या’ व्हायरल VIDEO बाबत पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टकरण
Suresh Koshta, father of Ashwini Koshta
Pune Porsche Accident:पोर्श धडकेत जागीच मृत्यू झालेल्या अश्विनीच्या वडिलांची सून्न करणारी प्रतिक्रिया, “आमची स्वप्नं..”
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली, म्हणाली; “प्लीज..”
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!

पोर्शे कारने दोघांनाही चिरडलं

अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचाही अपघातात मृत्यू झाला. पोर्शे कारने या दोघांना चिरडलं. पोर्शे कार चालवणारा कारचालक हा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा आहे. तो एका प्रतिथशय बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. या प्रकरणात त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. पण त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून या मुलाच्या वडिलांना अटक केली आहे. मात्र जो प्रसंग त्या रात्री घडला त्याबाबत अकिबने माहिती दिली आहे. अश्विनी आणि अनिश या दोघांना चिरडण्यात आलं. अश्विनीचा मृत्यू अपघाताच्या जागीच झाला. अनिश अवधियाला रुग्णालयात नेलं होतं पण तिथे त्याचा मृत्यू झाला असंही अकिबने सांगितलं आहे.

हे पण वाचा- Pune Porsche Accident: अश्विनी कोस्टा वडिलांना देणार होती वाढदिवसाचं सरप्राईज, मृतदेह पाहून आईने फोडला टाहो

अनिशच्या मित्राने अपघाताबाबत काय सांगितलं?

“अनिश आणि मी एकाच वर्गात होतो. आम्ही एकत्र इंजिनिअरिंग केलं आहे. तसंच आम्ही एकाच वयाचे असल्याने आमच्यात पटकन मैत्री झाली. अनिश खूप समजूतदार होता. त्याच्या जाण्याने माझं खूप नुकसान झालं आहे. त्याच्या कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.” अशीही माहिती अकिबने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.

अनिश आणि अकिबची मैत्री कशी झाली?

अनिश हा मूळचा मध्यप्रदेशातला होता. त्याने डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयातून इंजिनिअरिंग केलं आहे. त्यानंतर तो एका कंपनीत एंटर्नशीप करत होता. तिथेच त्याची आणि अश्विनी कोस्टाची ओळख झाली. त्यांच्यात चांगली मैत्रीही झाली. अनिश हा खूप हुशार विद्यार्थी होता. त्याला पुढील शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेला जायचं होतं ते त्याचं स्वप्न होतं. आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा कोडिंगविषयी चर्चा करायचो. एक मित्र म्हणूनही अनिश खूप चांगला माणूस होता. अशीही माहिती अकिबने दिली.

अनिश विमान नगर या ठिकाणी एका घरात भाडे तत्वावर राहात होता. त्याला फारसे मित्र नव्हते. तो त्याच्या लहान भावासह त्या घरात राहात होता. आम्हीच त्याचे जवळचे मित्र होतो. तसंच त्याला विविध पदार्थ खाण्याची आवड होती. आम्ही हॉटेलमध्ये गेलो तर तो आवर्जून दाल तडका मागवत असे अशीही आठवण अकिबने सांगितली.