मोटारीतून पैसे खाली पडल्याची बतावणी करून दोघा चोरट्यांनी लॅपटॉप, १८ हजारांची रोकड आणि  कागदपत्रे असा ८३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. फर्ग्युसन रस्त्यावरील हल्दीराम उपाहारगृह परिसरात बुधवारी (१० ऑगस्ट) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. यासंदर्भात विजय जगताप (वय ३० रा. ठाणे ) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजय हे मोटारचालक असून ते कामानिमित्त मालकाला घेऊन ठाण्याहून पुण्यात आले होते.  त्यांनी फर्ग्युसन रस्त्यावर त्यांनी मोटार थांबविली होती. त्यावेळी आलेल्या एकाने मोटारीच्या खिडकीवर टकटक केले. तुमचे पैसे खाली पडले आहेत, अशी बतावणी करून लक्ष विचलित केले. रस्त्यावर ८० ते ९० रूपये पडल्याचे दिसल्याने विजयने पैसे उचलण्यासाठी खाली उतरले. त्यावेळी चोरट्यांनी मोटारीतून लॅपटॉप, १८ हजारांची रोकड असा मिळून ८३ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे यांनी दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune pretending that money fell from the car pune print news amy
First published on: 11-08-2022 at 17:31 IST