प्राध्यापकाच्या आत्महत्येनं पुणे हादरलं! फेसबुकवर ‘बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी’ लिहित मृत्यूला कवटाळलं

मागील काही दिवसात प्रफुल्ल हे मानसिक तणावात होते, अशी माहिती मिळत आहे.

Pune Suicide
मेश्राम हे मानसिक आजाराचा सामना करत होते असं कळत आहे

पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाने फेसबुकवर बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी अशी पोस्ट लिहून. विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रफुल्ल दादाजी मेश्राम वय 45 (रा. कात्रज) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरात राहणारे प्रफुल्ल दादाजी मेश्राम हे कमिन्स महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होते. ते मध्यंतरी एका आजारातून बरे होऊन बाहेर पडले होते. त्यानंतर सर्व ठीकठाक सुरू होते. मात्र मागील काही दिवसात प्रफुल्ल हे मानसिक तणावात होते. ते कोणासोबत बोलत नव्हते.

हेही वाचा – डॉक्टर युवतीच्या खोलीत छुपे कॅमेरा लावणारा डॉक्टर गजाआड

त्याच दरम्यान त्यांनी काल दुपारच्या सुमारास “बाय बाय डिप्रेशन सॉरी गुड्डी”अशी एक पोस्ट फेसबुकवर लिहिली आणि पुरंदर येथील भिवरी गावातील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत उडून मारून आत्महत्या केली. ही पोस्ट त्यांच्या मित्र परिवाराने वाचताच, त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला समोरून काही प्रतिसाद मिळत नव्हता. या प्रकारामुळे सर्वांनी शोधाशोध सुरू केली. पण काही वेळाने एका व्यक्तीने विहिरीत आत्महत्या केल्याची पोलिसांना मिळताच घटनास्थळी पाहणी केल्यावर, तिथे गाडी, चावी, पॉकेट आणि रुमाल ठेवल्याचे दिसून आले.

आणखी वाचा – गाडीच्या बोनेटवर बसून व्हिडिओ शूट करण्याची हौस पडली महागात; नववधूसह व्हिडिओग्राफरवर गुन्हा दाखल

त्या वस्तूंची पाहणी केल्यावर ही व्यक्ती प्रफुल्ल मेश्राम असल्याचे समजले. त्यानुसार आम्ही त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीना कळविले. प्रफुल्ल यांचा मृतदेह सापडला असल्याचे सांगितले. आत्महत्येमागे आणखी काही कारण होते का याबाबत तपास करण्यात येत असल्याचे सासवड पोलिसानी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pune professor suicide due to depression cummins college svk 88 vsk

ताज्या बातम्या