पुणे : पुणे स्थानक परिसरातील पायाभूत सुविधांच्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून रविवारी (१३ सप्टेंबर) सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नऊ तासांचाविशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत पुणे-मुंबई एक्सप्रेससह सात गाड्या रद्द करण्यात येणार आहे\

प्रवाशांनी http://www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर किंवा एनटीईएस ॲपवर गाड्यांची स्थिती तपासूनच प्रवास करावा, अस3 आव्हान मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

या गाड्या रद्द

  • (९९९०२) पुणे – तळेगाव लोकल
  • (९९९०३) तळेगाव – पुणे लोकल
  • (९९८१८) पुणे – लोणावळा लोकल
  • (९९८१७) लोणावळा – शिवाजीनगर लोकल
  • (११००७) सीएसएमटी मुंबई – पुणे एक्स्प्रेस
  • (११००८) पुणे – सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस
  • (७१४०७) पुणे – दौंड डेमू

या गाड्या दुसऱ्या स्थानकांवर थांबणार

  • (१२९४०) जयपूर – पुणे एक्सप्रेस खडकी स्थानकावर थांबणार
  • (१२१३६) नागपूर – पुणे एक्सप्रेस हडपसर स्थानकावर थांबणार
  • (११४०६) अमरावती – पुणे एक्सप्रेस हडपसर स्थानकावर थांबणार
  • (१२१२७) सीएसएमटी – पुणे एक्सप्रेस खडकी स्थानकावर थांबणार
  • (११०७८) जम्मू तवी – पुणे एक्सप्रेस हडपसर स्थानकावर थांबणार
  • (९९८१३) लोणावळा – पुणे लोकल शिवाजीनगर स्थानकावर थांबणार
  • (७१४०६) बारामती – पुणे डेमू दौंड स्थानकावर थांबणार


या गाड्या दुसऱ्या स्थानकावरून सुटणार

  • (९९८२०) पुणे – लोणावळा लोकल शिवाजीनगरहून स्थानकातून सुटणार
  • (१२९३९) पुणे – जयपूर एक्स्प्रेस सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी खडकी स्थानकातून सुटणार
  • (१२१३५) पुणे – नागपूर एक्स्प्रेस सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी हडपसर स्थानकातून सुटणार
  • (१२१२८) पुणे – सीएसएमटी एक्स्प्रेस सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी खडकी स्थानकातून सुटणार