जुन्या पिढीतील ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॅा. भास्कर गंगाधर केळकर यांच्या शंभर वर्षांपूर्वीच्या पारपत्राचा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये पुनर्जन्म झाला आहे. डॅा. केळकर यांचे पुत्र आणि प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॅा. श्रीकांत केळकर यांनी जतन केलेल्या या पारपत्रावर शास्त्रीय प्रक्रिया करून हे पारपत्र केळकर कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.  

डॉ.भास्कर गंगाधर केळकर यांच्या या पारपत्रावर ८ ऑगस्ट १९२१ या दिनांकांचा नोंद आहे. एम. बी. बी. एस. पदवी संपादन केल्यानंतर ‘डिप्लोमा इन ऑप्थॅाल्मॅालॉजी’ करण्यासाठी लंडन येथे जाण्यासाठी त्यांनी हे पारपत्र काढले होते. मात्र, पुण्यामध्ये अपघात झाल्यामुळे त्यांचे परदेशी जाणे रद्द झाले. त्यामुळे या पारपत्रावर परदेश गमनाचे शिक्के नाहीत. भास्कर गंगाधर केळकर यांची आठवण म्हणून केळकर कुटुंबीयांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि पारपत्र जतन करून ठेवले आहे. त्यावेळी ब्रिटिशांचे राज्य असल्याने या पारपत्रावर राष्ट्रीयत्व या रकान्यासमोर ‘ब्रिटिश सब्जेक्ट’ असे लिहिले आहे. डॉ. भास्कर गंगाधर केळकर हे राजा केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर केळकर यांचे थोरले बंधू होत. या पारपत्रावर भांडारकर प्राच्यविद्या संस्थेने प्रक्रिया करून ते जतन करण्यात मदत केली आहे.
डॉ. श्रीकांत केळकर म्हणाले, या पारपत्राचे जतन करण्यासाठी भांडारकर संस्थेने सहकार्य केले. हा अनमोल ठेवा पुन्हा आमच्या घरी आला आहे.’ 

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Pune, School boy beaten,
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित
Panvel, gudi padwa, woman power
पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश
ग्रामविकासाची कहाणी

अनेक संस्थांना ही सेवा उपलब्ध करून दिली –

“भांडारकर संस्थेत सुरू असलेल्या ग्रंथजतन प्रकल्पांतर्गत अनेक संस्थांना ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. वैयक्तिक ठेवा जतन करून देण्याची ही पहिलीच वेळ आहे. कुटुंबातील दुर्मीळ कागदपत्रे जपण्याची अनेकांना हौस असते. हे ओळखून आम्ही ही सेवा सुरू केली आहे. ” अशी माहिती भांडारकार संशोधन संस्थेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी दिली आहे.