जुन्या पिढीतील ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॅा. भास्कर गंगाधर केळकर यांच्या शंभर वर्षांपूर्वीच्या पारपत्राचा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये पुनर्जन्म झाला आहे. डॅा. केळकर यांचे पुत्र आणि प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॅा. श्रीकांत केळकर यांनी जतन केलेल्या या पारपत्रावर शास्त्रीय प्रक्रिया करून हे पारपत्र केळकर कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ.भास्कर गंगाधर केळकर यांच्या या पारपत्रावर ८ ऑगस्ट १९२१ या दिनांकांचा नोंद आहे. एम. बी. बी. एस. पदवी संपादन केल्यानंतर ‘डिप्लोमा इन ऑप्थॅाल्मॅालॉजी’ करण्यासाठी लंडन येथे जाण्यासाठी त्यांनी हे पारपत्र काढले होते. मात्र, पुण्यामध्ये अपघात झाल्यामुळे त्यांचे परदेशी जाणे रद्द झाले. त्यामुळे या पारपत्रावर परदेश गमनाचे शिक्के नाहीत. भास्कर गंगाधर केळकर यांची आठवण म्हणून केळकर कुटुंबीयांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रे आणि पारपत्र जतन करून ठेवले आहे. त्यावेळी ब्रिटिशांचे राज्य असल्याने या पारपत्रावर राष्ट्रीयत्व या रकान्यासमोर ‘ब्रिटिश सब्जेक्ट’ असे लिहिले आहे. डॉ. भास्कर गंगाधर केळकर हे राजा केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर केळकर यांचे थोरले बंधू होत. या पारपत्रावर भांडारकर प्राच्यविद्या संस्थेने प्रक्रिया करून ते जतन करण्यात मदत केली आहे.
डॉ. श्रीकांत केळकर म्हणाले, या पारपत्राचे जतन करण्यासाठी भांडारकर संस्थेने सहकार्य केले. हा अनमोल ठेवा पुन्हा आमच्या घरी आला आहे.’ 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune rebirth of one hundred years old passport in bhandarkar sanstha pune print news msr
First published on: 02-07-2022 at 16:27 IST