पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सुरू असलेल्या पावसाचा जोर रविवारी काहीसा कमी झाला. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग १८ हजार क्युसेकवरून १४ हजार ८०१ करण्यात आला. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तिन्ही धरणे १०० टक्के भरली असून केवळ टेमघर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रतिक्षा आहे.

 सध्या चारही धरणांमधील पाणीसाठा ९८ टक्क्यांवर पोहोचला आहे. शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ५५ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ४२ मि.मी, पानशेत धरण परिसरात ४५ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात पाच मि.मी. पाऊस पडला. खडकवासला धरणातून मुठा नदीत रात्री दहा वाजल्यापासून १८ हजार ४९१ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. मात्र, रविवारी सकाळपर्यंत चारही धरणांच्या परिसरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला. त्यामुळे हा विसर्ग १४ हजार ८०१ क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे, असे खडकवासला धरण साखळी प्रकल्पाचे सहायक अभियंता यो.स.भंडलकर यांनी सांगितले.

nagpur, New Underpass, Road Under Railway line, Manas Chowk, Causes Issues, Large Vehicles, Traffic Congestion,
मानस चौकातील भुयारी मार्गामुळे नागपूरकरांना भोवळ! बोगदा संपताच सिग्नल असल्याने वाहतूक कोंडी
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
69 villages in Vasai will get water from Surya project
वसईतील ६९ गावांचा पाणी प्रश्न मिटला; लवकर सुर्या प्रकल्पातील पाणी मिळणार
multi color grapes export demand decline at global level
निर्यातीसाठी रंगीत द्राक्षांना मागणी घटली; जाणून घ्या कारणे काय ?

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत –

टेमघर                   ३.२८      ८८.४८
वरसगाव               १२.८२    १००
पानशेत                 १०.६५    १००
खडकवासला        १.९७      १००
एकूण                   २८.७२   ९८.५३

धरणांना तिरंगी विद्युत रोषणाई –

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या तीन धरणांना तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सध्या या तिन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी अनेक नागरिक धरण परिसरात गर्दी करत आहेत.