पुणे : पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे २४ संशयित रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्ण आढळून आलेल्या परिसरात संशयित रुग्णांच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली आहे. याचबरोबर तेथील पाण्याचे नमुनेही तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> ‘बटरफ्लाय’ पुलाचे ‘उड्डाण’ केव्हा? आतापर्यंत ४० कोटींचा खर्च; सात वर्षांनंतरही काम अपूर्ण

nashik health department alerted and establishments started necessary measures due to gbs patients
राज्यातील जीबीएस रुग्णवाढीमुळे जिल्हा आरोग्य विभाग सतर्क, आवश्यक कार्यवाही प्रारंभ
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Bombay HC raises concerns over funds not utilized for health sector infrastructure
आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा मुद्दा; निधी वापरला जात नसल्यावरून उच्च न्यायालयाचा संताप
Saif Ali Khan attack case, Saif Ali Khan,
सैफ हल्ला प्रकरण : आरोपीचा चेहऱ्याच्या पडताळणीचा अहवाल पोलिसांना प्राप्त, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल
Guillain Barre Syndrome , Sinhagad Road Area,
संशयित रुग्णांचे तातडीने फेरसर्वेक्षणाचे केंद्रीय उच्चस्तरीय पथकाचे निर्देश! जाणून घ्या नेमकं काय घडलं…
Court comments on demolishing rehabilitation building in Maharashtra Sadan objecting to municipality actions
महाराष्ट्र सदन प्रकरणातील पुनर्वसन इमारत पाडण्याच्या कारवाईवर न्यायालयाचे ताशेरे
complaint filed at Nagpur AIIMS against surgery head for harassing assistant professor
विभाग प्रमुखाकडून सहाय्यक प्राध्यापकाचा छळ… नागपूर एम्समध्ये…
beggar murder news in Pune,update in marathi
पुण्यातील लष्कर भागात भिक्षेकऱ्याची मारहाण करुन हत्या

पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २४ संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील ५ पुणे महापालिकेच्या हद्दीतील आहेत. याचबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील २, ग्रामीण भागातील १६ आणि जिल्ह्याबाहेरील १ रुग्ण आहे. यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात सर्वाधिक १० रुग्ण दाखल असून, पूना हॉस्पिटल ५, काशीबाई नवले रुग्णालय ४, भारती रुग्णालय ३, सह्याद्री हॉस्पिटल (डेक्कन) आणि अंकुरा हॉस्पिटल (औंध) येथे प्रत्येकी १ असे रुग्ण दाखल आहेत. यातील काशीबाई नवले रुग्णालयातील १ आणि भारती रुग्णालयातील १ असे एकूण २ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. याचबरोबर ८ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >>> अंबालिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड सर्वोत्कृष्ट साखर कारखाना; ‘व्हीएसआय’चे पुरस्कार जाहीर

याबाबत महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे म्हणाल्या, की गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या ८ संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत. हे तपासणी अहवाल हाती आल्यानंतर रुग्णांचा आजार स्पष्ट होईल. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या परिसरात इतर व्यक्तींमध्ये सारखी लक्षणे दिसून येत आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. याचबरोबर रुग्णांनी अलीकडच्या काळात प्रवास केला होता का, याचीही माहिती घेण्यात येत आहे. रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील पिण्याच्या पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत. हे तपासणी अहवाल मिळाल्यानंतर नेमक्या आजाराचे निदान होईल. आताच हे रुग्ण गुइलेन बॅरे सिंड्रोमचे आहेत, असे म्हणता येणार नाही.

– डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, महापालिका

नेमका आजार काय?

गुईलेन बॅरे सिंड्रोम हा दुर्मीळ विकार आहे. जगभरात दर १ लाख लोकसंख्येमागे एका व्यक्तीला हा आजार जडतो. हा आजार सर्वच वयोगटांतील व्यक्तींना होतो. या आजारात रुग्णाची प्रतिकारशक्ती त्याच्या चेतासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे रुग्णाला स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवता येत नाही. याचबरोबर रुग्णाच्या संवेदना बधिर होऊन तापमान आणि स्पर्शसंवेदना जाणवत नाहीत. ही लक्षणे काही आठवडे राहतात. अनेक रुग्ण हे दीर्घकालीन गुंतागुंत न होता या आजारातून बरे होतात. काही रुग्णांना मात्र या आजारातून बरे झाल्यानंतरही काही काळ अशक्तपणा जाणवतो.

आजार कशामुळे होतो?

गुईलेन बॅरे सिंड्रोम हा आजार नेमका कशामुळे होतो हे अद्याप पूर्णपणे समजलेले नाही. अनेक वेळा विषाणू अथवा जीवाणू संसर्गानंतर या आजाराचा प्रादुर्भाव होतो आणि रुग्णाची प्रतिकारशक्तीच त्याच्या शरीरावर हल्ला करते. कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी या जीवाणूमुळे हा आजार होण्याचा धोका अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. यात उलट्या, जुलाब अशी लक्षणे दिसून येतात. फ्लू अथवा सायटोनेगालोव्हायरस, एपस्टाईन-बार विषाणू आणि झिका विषाणूच्या संसर्गानंतरही हा आजार होतो. फ्लूच्या लसीमुळेही काहींना हा आजार झाल्याचे समोर आले आहे.

आजाराची लक्षणे कोणती?

– हाता-पायातील ताकद कमी होणे.

– हाता-पायाला मुंग्या येणे.

– गिळण्यास आणि बोलण्यास त्रास होणे.

– धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे.

– पक्षाघात.

रुग्ण कोठे आढळले?

पुणे महापालिका – नातूबाग (बाजीराव रस्ता), कांचनबन सोसायटी (कोथरूड), दांडेकर पूल, पर्वती दर्शन, माणिकबाग (सिंहगड रस्ता)

पिंपरी-चिंचवड महापालिका – संत तुकारामनगर, थेरगाव.

पुणे ग्रामीण – गुरुकुल डीएसके (किरकिटवाडी), डीएसके विश्व (धायरी), नांदेड, उज्ज्वल निसर्ग सोसायटी (किरकिटवाडी), कोल्हेवाडी (सिंहगड रस्ता), खडकवासला, सीडब्ल्यूपीआरएस कॉलनी (सिंहगड रस्ता) महादेवनगर, जाधवनगर (नांदेड फाटा), आंबेगाव धाराशिव – मुरुम (ता. उमरगा)

शासकीय यंत्रणांमध्ये हद्दीचा वाद

पुण्यातील २४ संशयित रुग्णांपैकी महापालिकेच्या हद्दीतील ५ रुग्ण असून, ग्रामीण हद्दीतील १६ रुग्ण असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. ग्रामीण भागातील रुग्ण हे खडकवासला, किरकिटवाडी आणि नांदेडगाव परिसरातील आहेत. यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी हा भाग महापालिकेचा असल्याने आमच्याकडे कोणतेही संशयित रुग्ण आढळून आले नसल्याचा दावा केला. याचबरोबर महापालिकेच्या ताब्यात अद्याप हा भाग गेला नसल्याने आम्ही तिथे आरोग्य सेवा देत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे या रुग्णांच्या बाबतीतही शासकीय यंत्रणांतील हद्दीचा वाद समोर आला आहे.

Story img Loader