पुणे : बेरोजगार तरूणांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन उद्या (मंगळवारी) करण्यात आले असून, त्यांना विविध चांगल्या कंपन्यांत नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि वेल्ह्यातील वीर बाजी पासलकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेल्हे यांच्या वतीने हा मेळावा होणार आहे.
वेल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) उद्या सकाळी १० वाजता हा रोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील उद्योजकांनी त्यांचा सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून ३५५ पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आली आहेत. ही सर्व पदे हेल्पर, ट्रेनी, मशिन ऑपरेटर, सुपरवायझर, फिटर, क्वालिटी इन्सपेक्टर, सीएसओ फिल्ड ऑफिसर उमेदवारांसाठी आहे. दहावी, बारवी उत्तीर्ण आणि आयटीआय पदवीधारक तरुणांसाठी हा मेळावा आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीतजास्त उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश वराडे यांनी दिली.
रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होत आल्याने इच्छुक उमेदवारानी रिक्तपदांच्या अधिक माहितीसाठी विभागाच्या http://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन मेळाव्यातील रिक्त पदांसाठी अर्ज करावेत. रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून, आपला सहभाग नोंदवावा. उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती सोबत ठेवाव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (रास्ता पेठ, पुणे) येथे प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्रमांक ०२०- २६१३३६०६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन वराडे यांनी केले आहे.
सहभागी कंपन्या
या मेळाव्यात एकूण नऊ कंपन्या सहभागी होणार असून, ३५५ पदे भरली जाणार आहेत. वर्ल्डवाईड ऑईलफिल्ड मशिन कंपनीत ५० प्रशिक्षणार्थी, निफॅब इंडिया कंपनीत हेल्पर अथवा ऑपरेटर, गुरूदत्त सीएनसी कंपनीत १० ट्रेनी, सायन्युमेरो निर्माण कंपनीत ५० मशिन ऑपरेटर, फाईन हँडलिंग अँड ऑटोमेशन कंपनीत १० आयटीआय फिटर, असेंब्ली फिटर, एमपी एंटरप्रायझेस कंपनीत ५० हेल्पर, सुपरवायझर, सीएनसी, व्हीएमसी, कॅटॅलिड इंजिनिअरिंग कंपनीत ५० क्वालिटी इन्स्पेक्टर, इंटिग्रेटेड पर्सोनेल सर्व्हिसेस कंपनीत ५० क्वालिटी इन्स्पेक्टर व मशिन ऑपरेटर, जे पॅन ट्युब्युलर कॉम्पोनन्ट कंपनीत २० ऑपरेटर, क्वालिटी इन्स्पेक्टरची भरती केली जाणार आहे.
