scorecardresearch

पुणे: एका मिनिटात कारची काच फोडून २० लाख रुपये लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद

पुणे शहरातील बाणेर येथे ही घटना घडली आहे

Pune Rs 20 lakh for breaking a car glass in one minute Incident captured on CCTV

पुण्याच्या बानेरमध्ये कारची काच फोडून तब्बल २० लाख अज्ञात व्यक्तीने पळवले असल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. प्रमोद बबनराव बोराटे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपीने अवघ्या एक मिनिटात काच फाडून २० लाख लंपास केले आहेत. दरम्यान, अशाच प्रकारची काच फोडण्यास अर्धा तास लागत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रमोद हे उद्योजक आहेत. प्रमोद बोराटे यांनी स्वतःच्या कारमध्ये २० लाख रुपये दुसऱ्या सहकाऱ्याला देण्यासाठी ठेवले होते. मात्र, अज्ञात व्यक्तीने पाळत ठेऊन बाणेर येथे कार पार्क केल्यानंतर पाठीमागील उजव्या बाजूची काच अवघ्या एका मिनिटात फोडून तब्बल २० लाख रुपये लंपास केले आहेत. अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कारची चावी आत अडकली होती तेव्हा, प्रमोद यांना काच फोडण्यास अर्धा तास लागला होता अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून मात्र आरोपींचे चेहरे त्यामध्ये स्पष्ट दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान हिंजवडी पोलिसांसमोर आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-11-2021 at 17:09 IST

संबंधित बातम्या