पुणे : पुणे शहर व परिसरामध्ये अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजामध्ये बदल केला आहे. वाहन योग्यता प्रमाणपत्र, वाहन चालविण्याच्या शिकाऊ परवाना आणि पक्का परवान्याच्या चाचण्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. दिवे चाचणी मैदान : दिवे चाचणी मैदान येथे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी २५ जुलैला बोलाविलेल्या वाहनधारकांनी त्यांची वाहने शनिवारी (ता.२७) दिवे येथे तपासणीसाठी सादर करावीत. याकरिता नव्याने वेळ घेण्याची आवश्यकता नाही. हेही वाचा.शहरबात : पिता-पुत्र जोडीची सायकलवरून पंढरीची वारी आळंदी रस्ता चाचणी मैदान : आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तसेच वाहन तपासणीविषयक अन्य कामासाठी २५ जुलैला बोलाविलेल्या वाहनधारकांनी त्यांची वाहने शनिवारी (ता.२७) आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे तपासणीसाठी सादर करावित. याकरिता नव्याने वेळ घेण्याची आवश्यकता नाही. हेही वाचा.पीएमआरडीएचा आपत्कालीन विभाग सक्रिय.. तीन पथके, दोन रबर बोटी, रेस्क्यु उपकरणासह मदतीसाठी रवाना शिकाऊ परवाना व पक्का परवाना चाचणी : प्रादेशिक परिवहन कार्यालय संगम ब्रीज येथील शिकाऊ परवाना चाचणी व पक्का परवाना चाचणीसाठी आयडीटीआर तसेच आळंदी रस्ता चाचणी मैदान येथे २५ जुलैला बोलाविलेल्या अर्जदारांनी कार्यालयीन कामकाजाच्या पुढील सात दिवसात कोणत्याही दिवशी चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी कळविले आहे.