पुणे : मुठा नदीच्या पूना हॉस्पिटलजवळील पात्रात सोमवारी सायंकाळी एक शाळकरी मुलगा वाहून गेला. मुलगा बुडाल्यानंतर तातडीने शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागू शकला नाही.
खडकवासला धरण साखळीत संततधार असल्याने रविवारी रात्री मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर सोमवारी सकाळी भिडे आणि शिवणेमधील पूल पुन्हा पाण्याखाली गेला. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. भिडे पुलावरून पाणी वाहू लागल्याने पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूस तात्पुरते कठडे उभे करून पूल वाहतुकीस बंद केला होता.
हेही वाचा – मधुमेहींच्या जखमांवर आता प्रभावी उपचार! पुण्यातील कंपनीनं शोधलं नवीन औषध
हेही वाचा – दुर्दम्य इच्छाशक्ती! जीवघेण्या आजारावर मात करून तिची पावले पुन्हा थिरकली
पूना हॉस्पिटलजवळील एसएम जोशी पुलाच्या पात्रातही मोठ्या प्रमाणावर पाणी होते. तेथील एका बाकड्यावर एक शाळकरी मुलगा बसला होता. तो अचानक नदीपात्रात पडला असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अनेकांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. तातडीने अग्निशामक दलाला हा प्रकार कळवण्यात आला. या दलाच्या जवानांनी तातडीने मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागू शकला नाही.
© The Indian Express (P) Ltd