पुणे विमानतळावर नवीन टर्मिनलची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे येथून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय माल वाहतूकही सुरू करण्यात येणार आहे.पुणे विमानतळाचा विकास होताना शहराचाही विकास होणार आहे, असे मत केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केले.शिंदे यांनी गुरुवारी रात्री दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून पुणे-सिंगापूर या आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे उद्घाटन केले. त्या वेळी ते बोलत होते. विमानतळावर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि खासदार गिरीश बापट, विमानतळाचे संचालक संतोष ढोके, विस्तारा कंपनीचे विनोद कन्नन, एअरमार्शल (नि.) भूषण गोखले, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबाने, सुधीर मेहता आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे: राज्यात हलका गारवा; तीन दिवसांत पुन्हा तापमानवाढीची शक्यता

dubai flood
Dubai Flood: दुबईची झाली डुबई! दोन वर्षांचा पाऊस एकाच दिवसात, वाळवंटात आला पूर, पाहा VIDEO
pune airport marathi news
पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कधी सुरु होणार? विमानतळाच्या संचालकांनी दिलं उत्तर…
Mumbai flight canceled due to off runway lights at Nagpur airport
नागपूर: धावपट्टीवर अंधार, मुंबई विमान रद्द
Mumbai, Cyber ​​fraud, Taddeo,
मुंबई : ताडदेवमधील आंतराष्ट्रीय शाळेची ८७ लाखांची सायबर फसवणूक, सायबर पोलिसांना ८२ लाख रुपये गोठवण्यात यश

शिंदे म्हणाले, की पुणे माझे शहर आहे. देशाचे शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्र सुद्धा आहे. मराठा साम्राज्याचा सूर्य येथूनच उगवला. या शहराच्या प्रत्येक कणाकणात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या पुणे शहराची आणि पुणेकरांची सेवा करण्याची संधी मला मिळत आहे, याचा मला अभिमान आहे.संतोष ढोके म्हणाले, पुणे-सिंगापूर सेवेचा आठवड्यातून चार दिवस पुणेकर प्रवासी लाभ घेऊ शकतील. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी पुण्यातून सिंगापूरसाठी विमानांची उड्डाणे होतील.