पुणे-सिंगापूर विमानसेवा सुरू | Pune Singapore Airline Service Started pune print news amy 95 | Loksatta

पुणे-सिंगापूर विमानसेवा सुरू

पुणे विमानतळावर नवीन टर्मिनलची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे येथून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय माल वाहतूकही सुरू करण्यात येणार आहे.

AIRPLANE
(संग्रहित छायचित्र)

पुणे विमानतळावर नवीन टर्मिनलची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे येथून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय माल वाहतूकही सुरू करण्यात येणार आहे.पुणे विमानतळाचा विकास होताना शहराचाही विकास होणार आहे, असे मत केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केले.शिंदे यांनी गुरुवारी रात्री दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून पुणे-सिंगापूर या आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे उद्घाटन केले. त्या वेळी ते बोलत होते. विमानतळावर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि खासदार गिरीश बापट, विमानतळाचे संचालक संतोष ढोके, विस्तारा कंपनीचे विनोद कन्नन, एअरमार्शल (नि.) भूषण गोखले, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबाने, सुधीर मेहता आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे: राज्यात हलका गारवा; तीन दिवसांत पुन्हा तापमानवाढीची शक्यता

शिंदे म्हणाले, की पुणे माझे शहर आहे. देशाचे शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्र सुद्धा आहे. मराठा साम्राज्याचा सूर्य येथूनच उगवला. या शहराच्या प्रत्येक कणाकणात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या पुणे शहराची आणि पुणेकरांची सेवा करण्याची संधी मला मिळत आहे, याचा मला अभिमान आहे.संतोष ढोके म्हणाले, पुणे-सिंगापूर सेवेचा आठवड्यातून चार दिवस पुणेकर प्रवासी लाभ घेऊ शकतील. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी पुण्यातून सिंगापूरसाठी विमानांची उड्डाणे होतील.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 12:12 IST
Next Story
पुणे: राज्यात हलका गारवा; तीन दिवसांत पुन्हा तापमानवाढीची शक्यता