प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने १५ सप्टेंबरपासून ट्रेन क्रमांक ११४१७ / ११४१८ पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेसची सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ११४१७ पुणे – सोलापूर एक्स्प्रेस १५ सप्टेंबरपासून पुण्याहून रात्री अकरा वाजता सुटेल आणि सोलापूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ७.५५ वाजता पोहोचेल आणि गाडी क्रमांक ११४१८ सोलापूरहून १५ सप्टेंबरपासून सकाळी ११.४० वाजता सुटेल आणि पुण्याला सायंकाळी ७.२५ वाजता पोहोचेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही गाडी हडपसर, मांजरी, लोणी, उरुळी, यवत, केडगाव, पाटस, दौंड, मलठण, भिगवण, जिंतूर रोड, पारेवाडी, वाशिंबे, पोफळज, जेऊर, भाळवणी, केम, ढवळस, कुर्डुवाडी, वडशिंगे, माढा, वाकाव, अनगर, मलिकपेठ, मोहोळ, मुंढेवाडी आणि पाकणी या स्थानकांवर थांबणार असून या गाडीला द्वितीय श्रेणीतील १२ डबे असतील. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune solapur express service resumes pune print news amy
First published on: 13-08-2022 at 17:41 IST