scorecardresearch

पुणे : पतीच्या त्रासाला कंटाळून शिक्षिकेची गळफास घेऊन आत्महत्या

पतीसह सात जणांविरोधात हडपसर पोलिसात गुन्हा दाखल

(प्रातिनिधिक छायाचित्र)

पुण्यातील हडपसर भागात राहणार्‍या २७ वर्षीय शिक्षिकेने पतीच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पतीसह सात जणांविरोधात हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरती भोसले (वय २७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोपी पती विश्वजीत भोसले याच्यासह सात जणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती यांचा विवाह २०१९ मध्ये विश्वजीत यांच्यासोबत झाला होता. त्या दोघांमध्ये सुरुवातीला सर्वकाही ठीक होतं. तसेच आरती या एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करीत होत्या. पण त्याच दरम्यान पती विश्वजीतसह त्याचे कुटुंबीय आरती यांना त्रास देऊ लागले. या सततच्या त्रासाला कंटाळून आरती यांनी १९ एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

या प्रकरणी आरती यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार विश्वजीत भोसले यांच्यासह सात जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे हडपसर पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune teacher commits suicide by strangulation as she is being abused by her husband msr 87 svk

ताज्या बातम्या