महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) पुणे विभागांतर्गत सिंहगड आणि अक्कलकोट ही दोन निवासस्थाने वर्षभरानंतरही बंदच आहेत. सिंहगड येथील निवासस्थानाचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. एमटीडीसी पुणे विभागाकडून मात्र, पाणी, वीज आणि अपुरे बांधकाम अशा तांत्रिक कारणांमुळे दोन्ही निवासस्थाने अद्यापही सुरू करण्यात आली नसल्याचे कारण देण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्यटन महामंडळाच्या पुणे विभागांतर्गत महाबळेश्वर, पानशेत, माथेरान, माळशेज, कार्ला, भीमाशंकर आणि कोयनानगर अशी सात निवासस्थाने होती. त्यामध्ये गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात सिंहगड आणि अक्कलकोट या दोन निवासस्थानांची भर पडल्याने महामंडळाच्या पुणे विभागांतर्गत एकूण नऊ निवासस्थाने झाली आहेत. सिंहगड निवासस्थान हा बंगला पूर्वी रेव्हेन्यू वेल्फेअर असोशिएशनचा साधा बंगला होता. त्याच्या खोल्या देखील सध्या होत्या. यापूर्वी हा पूर्वी बंगला भाडेतत्वावर दिला होता. गेल्या वर्षी त्याचे नूतनीकरण करण्यात आले. गडावर पर्यटनची ३२ गुंठे जागा आहे. या जागेवर महामंडळाकडून पर्यटक निवास बांधण्यात आले होते. राज्य सरकारच्या पर्यटनच्या नवीन धोरणानुसार पर्यटक निवासाची दुरुस्ती आणि श्रेणीवाढ करणे आवश्यक होते. त्यानुसार, पर्यटक निवासांची कामे महामंडळाने केली आहेत. या पर्यटक निवास इमारतीची श्रेणीवाढ करताना अस्तित्वातील इमारतीमध्येच दोन सूट, एक व्हीआयपी सूट, एक लोकनिवास (डॉरमेटरी), व्यवस्थापक कक्ष, उपाहारगृह आणि डायनिंगची सुविधा केली आहे. दोन सूट, व्हीआयपी सुट वातानुकूलित केला आहे. सुटमध्ये आकर्षक सिलींग, आधुनिक फर्निचर बनविले असून आधुनिक स्वच्छतागृह केले आहे. या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी प्रत्येकी अशा दोन लोकनिवास (डॉरमेटरी) आहेत. एका वेळी प्रत्येकी आठ पर्यटक येथे राहू शकतात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune the sinhagad residence of mtdc inaugurated by the chief minister remains closed even after a year pune print news msr
First published on: 11-08-2022 at 13:06 IST