scorecardresearch

पुणे : जंगली महाराज रस्त्यावर मोबाइल दुकानात चोरी

जंगली महाराज रस्त्यावरील मोबाइल विक्री दरवाजा उचकटून चोरट्यांनी मोबाइल संच, साहित्य तसेच रोकड असा ३५ हजारांचा मुद्देमाल लांबविला.

पुणे : जंगली महाराज रस्त्यावर मोबाइल दुकानात चोरी
( संग्रहित छायचित्र )

जंगली महाराज रस्त्यावरील मोबाइल विक्री दरवाजा उचकटून चोरट्यांनी मोबाइल संच, साहित्य तसेच रोकड असा ३५ हजारांचा मुद्देमाल लांबविला.याबाबत किशोर चौधरी (वय ५२, रा. जुना ताेफखााना, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौधरी यांचे जंगली महाराज रस्त्यावर जे. एम. कम्युनिकेशन मोबाइल विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी मोबाइल दुकानाचा दरवाजा मध्यरात्री उचकटला.

हेही वाचा – पिंपरी : भोसरीतील महिलेच्या खून प्रकरणातील अज्ञात आरोपी सीसीटीव्हीमुळे जाळ्यात

चोरट्यांनी चार नवीन मोबाइल संच तसेच दुरुस्तीसाठी आलेले मोबाइल संच, मोबाइल साहित्य असा मुद्देमाल लांबविला. मोबाइल दुकानाचा दरवाजा उचकटून चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक माने तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.