पुण्यातील मार्केटयार्ड येथील व्यापाऱ्याच्या घरातील तब्बल ६० तोळ सोने-चांदीचे दागिने आणि काही रक्कम अशी एकूण ३० लाखांची चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना बिबवेवाडी पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. मुस्तफा शकील अन्सारी (रा. ग्रीन पार्क कोंढवा), जुनेद रिजवान सैफ आणि हैदर कल्लू शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील सोबा सवेरा या सोसायटीमधील १० व्या मजल्यावर मार्केटयार्ड येथील एक व्यापारी राहतात. ते २० जून रोजी दुपारच्या सुमारास कुटुंबीयांसह बाहेर गेले होते. त्यावेळी आरोपी मुस्तफा शकील अन्सारी याने टेरेसवरील ग्रील तोडून घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने काही तासात सोने,चांदीचे दागिने आणि काही रक्कम अशी मिळून जवळपास ३० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्या घरात राहणारी मंडळी आल्यावर घरातील वस्तू इतरत्र पडल्याचे दिसून आले. त्यानंतर घरफोडीची घटनासमोर आली. त्यावर त्यांनी आमच्याकडे तक्रार देताच, आम्ही घटनास्थळी धाव घेतली आणि त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी आरोपी मुस्तफा शकील अन्सारी आणि अन्य दोन आरोपी संशयितरित्या आढळून आले.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Pune cyber crime Five Delivery Boy
दिवसा डिलीव्हरी बॉय, रात्री सायबर क्रिमिनल; कोट्यवधीची फसवणूक करणारे आरोपी जेरबंद
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
Gang demanding extortion from municipal contractor arrested
महापालिकेच्या कंत्राटदाराकडून खंडणी उकळणारी टोळी अटकेत

त्या आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केल्यावर, या तिघा आरोपींना २ जुलै रोजी अटक करण्यात आली. त्या तिघांकडे चौकशी केल्यावर, यातील मुख्य आरोपी मुस्तफा शकील अन्सारी याने घरातील बाथरूमवरील पाण्याच्या टाकीत, आरोपी जुनेद रिजवान सैफ याने फ्रीजच्या कंप्रेसरमधील पाण्यात सोने चांदीचे दागिने ठेवले. तर तिसरा हैदर कल्लू शेख याने काही दागिने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. या तिघांकडून सोने-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून या आरोपीकडे चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.