VIDEO: “आज तुझा माजच उतरवणार आहे,” पुण्यात वाहतूक पोलिसांनी बसची काच फोडली, चालकाला शिवीगाळ

बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल; पोलिसांकडून चौकशी सुरु

Pune Police, Bandgranden Police, पुणे पोलीस, शिवनेरी
बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल; पोलिसांकडून चौकशी सुरु

पुण्यात वाहतूक पोलिसांनी शिवनेरी बसच्या चालकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत बसची काच फोडल्याची घटना समोर आली आहे. पुणे स्टेशन येथील मालधक्का चौकात शिवनेरी बस वळवताना चालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये हा वाद झाला. यावेळी वाहतूक पोलिसांनी चालकासोबत वाद सुरु असतानाच बसची काच फोडली. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. दरम्यान चालकाने याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

शिवनेरी बसवरील चालक बाळकृष्ण फुलसुंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सोमवारी संध्याकाळी ६ ते ६.३० च्या दरम्यान पुणे स्टेशन एसटी आगार येथून दादर शिवनेरी बस क्रमांक MH01 CV 7712 ही मालधक्का चौकाकडे घेऊन जात होतो. त्यावेळी तेथील चौकातील वाहतूक पोलीस कर्मचार्‍याला अनेक वेळा विनंती केली की, गाडी थोडी वळवून घेऊ द्या. पण ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी गाडी वळवून घेत असताना त्यांनी गाडीचा वायपर तोडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर काचेवर दगड मारला आहे. यामुळे मोठं नुकसान झालं आहे”. मी बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार केली असून याबाबत चौकशी करून संबधित पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

बंडगार्डन पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक तुकाराम फड यांना या घटनेबाबत विचारले असता ते म्हणाले की, मालधक्का चौकात शिवनेरी बसच्या नुकसानीबाबत आमच्याकडे तक्रार आली असून त्याबाबत चौकशी सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pune traffic police breaks mirror of shivneri bus after fight with driver svk 88 sgy

ताज्या बातम्या