scorecardresearch

पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू ; कोंढवा, नगर रस्ता भागात अपघात

शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू ; कोंढवा, नगर रस्ता भागात अपघात
( संग्रहित छायचित्र )

शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कोंढवा तसेच नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात अपघात झाले.नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेने पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रदीप रमेश काळे (वय २५, रा. गाडे वस्ती, वाघोली, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत प्रदीपचा भाऊ आकाश (वय २८) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रदीप नगर रस्त्यावरुन जात होता. त्या वेळी गाडे वस्ती परिसरात भरधाव वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या प्रदीपला धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या प्रदीपचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पसार झालेल्या वाहनचालकाचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

दरम्यान, कोंढव्यातील साळुंके विहार परिसरात भरधाव दुचाकीने दुचाकीस्वार तरुणास धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दीपक अशोक आवारे (वय १७, रा. महम्मदवाडी रस्ता, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत दीपकचा चुलतभाऊ अभिषेक (वय २२) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार दीपक साळुंके विहार रस्त्याने जात होता. त्या वेळी भरधाव दुचाकीने दुचाकीस्वार दीपकला धडक दिली. अपघातात दीपक गंभीर जखमी झाला. दीपकच्या दुचाकीला धडक देणारा दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले. दीपकला गंभीर दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या