पुणे : लाँन्ड्री व्यावसायिकाकडे दरमहा पाच हजार रुपये हप्त्याची मागणी करुन दुकानाची तोडफोड करणाऱ्या सराइताविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सराइताने परिसरात दहशत माजवून मोटारीची काच फोडली.

याप्रकरणी एका सराइताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका लाँन्ड्री व्यावसायिकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात दांगट पाटीलनगर इस्त्री आाणि कपडे धुलाईचे दुकान आहे. आरोपी तीन दिवसांपूर्वी शिवणे भागात आला. त्याच्याकडे गज होता. ‘या भागाचा मी दादा आहे. या भागात व्यवसाय करायचा असेल, तर दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल’, अशी धमकी त्याने लाँन्ड्री व्यावसायिकाला दिली. पैसे न दिल्यास दुकान जाळून टाकण्याची धमकी त्याने दिली.

Person carrying pistol is arrested action taken in Karvenagar area
पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआड, कर्वेनगर भागात कारवाई
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Accused of vandalizing vehicles in Kasba Peth arrested Pune news
कसबा पेठेत वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची धिड
pune koyta attack news
पुणे : बिबवेवाडीत तोडफोड करणाऱ्या आरोपीविरुद्ध आणखी एक गु्न्हा, तरुणावर कोयत्याने वार
kawad village bhiwandi wada road theft attempt failed
बंगल्यात चोरी करण्यासाठी चोरट्यांची टोळी जीपगाडीने आली पण मार खाऊन गेले
vasai virar gold loksatta news
वसई : पोलिसांच्या तपासावर सराफाचे प्रश्नचिन्ह, लुटीतील उर्वरित ६०० ग्रॅम सोने गेले कुठे?
congress leader vijay wadettiwar reacts on criminal in santosh deshmukh murder case
“संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना पाठीशी घालणारे नालायक…”, वडेट्टीवार यांची टीका
four arrested including ex corporator swapnil Bandekar in Rs 10 crore extortion case
बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली १० कोटींची खंडणी; माजी नगरसवेक स्वप्निल बांदेकरसह चौघांना अटक

हेही वाचा – पुणे : पावसामुळे हापूसचा हंगाम सुरू होण्यास विलंब, मार्केट यार्डात हंगामपूर्व हापूसची पहिली पेटी दाखल

त्यानंतर त्याने व्यावसायिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या भागातील एका मोटारीची काच फोडली. शिवणे भागातील दांगट पाटीलनगर परिसरात लघुउद्योजकांचे कारखाने आहेत. या भागातील आणखी एका व्यावसायिकाला त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितली. त्यांनी कारखाना पेटवून देण्याची धमकी दिली. मी पोलिसांना घाबरत नाही, अशी धमकी देऊन तो पसार झाला. घाबरलेल्या व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक भरसट तपास करत आहेत.

हेही वाचा – पुणे : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा काळाबाजार, सिंहगड रस्ता पोलिसांकडून ६१ सिलिंडर जप्त

तडीपार गुंडाकडून खंडणीची मागणी

तडीपार गुंडाने किराणा माल दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडे खंडणीची मागणी केल्याची घटना हडपसर भागातील माळवाडी परिसरात घडली. याप्रकरणी तडीपार गुंडाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किराणा माल दुकानदाराने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराइताला शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी तो रात्री माळवाडीतील किराणा माल दुकानात आला. त्याने दुकानदाराला खंडणीची मागणी केली. त्याला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविला. शस्त्र उगारुन त्याने दहशत माजविली. पोलीस उपनिरीक्षक मुलाणी तपास करत आहेत.

Story img Loader