scorecardresearch

पुणे : धायरीत टोळक्याची दहशत; कोयत्याचा धाक दाखवून मारहाण आणि वाहनांची केली तोडफोड

या टोळक्याने सोसायटीच्या आवारात दगडफेक केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे

(संग्रहीत छायाचित्र)

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील धायरीत टोळक्याने दहशत माजवून तीन मोटारी आणि दुचाकीची तोडफोड केली. टोळक्याने एकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याला मारहाणही केली आणि एका सोसायटीच्या आवारात दगडफेक करुन दहशत माजविली.

योगेश चव्हाण, आदेश बाणेकर, दत्ता मरगळे, निखील शिरसाठ अशी गुन्हा दाखल केलेल्या सराईतांची नावे आहेत. यज्ञेश उर्फ युवराज पोकळे (वय २६, रा. धायरी, सिंहगड रस्ता) याने याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यज्ञेश आणि त्याचा मित्र रात्री धायरीतील गणेशनगर भागात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी चव्हाण, बाणेकर, मरगळे, शिरसाठ तेथे आले. त्यांच्या टोळक्याने यज्ञेशला कोयत्याचा धाक दाखविला आणि त्याच्याकडील साडेतीन हजारांची रोकड लुटली.

त्यानंतर रस्त्याच्या कडेला लावलेल्या तीन मोटारी आणि दुचाकीची तोडफोड करुन ते पसार झाले. टोळक्याने एका सोसायटीच्या आवरातही दगडफेक करुन दहशत माजविली. पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक निरीक्षक चेतन थोरबोले तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune vehicle vandalism and stone pelting by a group of youths in dhayari pune print news msr

ताज्या बातम्या