Pune Water Cut Thursday April 16: पुणे महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी (१६ एप्रिलला) शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ही देखभाल दुरुस्तीची कामे करणे आवश्यक असल्याने गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

गुरुवारी या कामामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (१७ एप्रिल) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र अखत्यारीतील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर पंपिंग येथे विद्युत विषयक देखभाल व दुरुस्तीची कामे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने केली जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराचाच पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी ही माहिती दिली.

पाणीपुरवठा बंद असणाऱ्या भागांमध्ये पर्वती जलकेंद्राच्या अखत्यारीतील शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकूंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर.

वडगाव जलकेंद्र परिसरातील हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक या परिसराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. कर्वे रोड ते एसएनडीटी, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डडाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सव्र्हे नंबर ४२ व ४६ कोंढवा खुर्द, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.

वारजे जलकेंद्र परिसरातील चतु:शृंगी, एसएनडीटी, पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलनी, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ, वारजे हायवे, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहु कॉलनी,

वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड. नवीन होळकर पंपिंग परिसरातील विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर आणि परिसर.

नगर रोड आणि लष्कर जलकेंद्र परिसराच्या अखत्यारीतील लष्कर भाग, पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, नगररस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.