पुणे : पर्वती येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याची गळती थांबविण्यासाठी महापालिकेने काम हाती घेतले होते. त्यामुळे दोन दिवस शहराच्या मध्यवर्ती भागात पाणी कमी दाबाने येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले होते. आता अजून दोन दिवस ५०० दशलक्ष लिटर टाकीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पर्वती येथील पाइपलाइनमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने याचे काम सुरू केले होते. या कामामुळे दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. मात्र, दोन दिवस झाल्यानंतरही तिसऱ्या दिवशी मंगळवारी देखील मध्यवर्ती पेठांमध्ये पाणी आले नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. मध्यवर्ती भागात पाणी आलेच नाही, असे नगरसेवक विशाल धनवडे यांनी सांगितले.
दरम्यान, पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील प्रतिदिन ५०० दशलक्ष लिटर क्षमतेच्या टाकीच्या दुरुस्तीचे काम तातडीने करावे लागणार आहे. त्यामुळे या टाकीवर अवलंबून असलेल्या परिसरात आज (बुधवारी) ५ ऑगस्टला दुपारी दोन ते सायंकाळी सातपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, या कामामुळे उद्या (गुरुवारी) ६ ऑगस्टला सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
एसएनडीटी (एमएलआर): विधी महाविद्यालय रस्ता ,पौड रस्ता, शीलाविहार कॉलनी, अद्वैत सोसायटी, भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर, सहवास, क्षिप्रा, मनोहन सोसायटी, विठ्ठल मंदिर परिसर, गोसावी वस्ती परिसर, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बिग बाझार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी. पी. रस्ता (काही भाग), मयूर कॉलनी परिसर, मयुर डी.पी. रस्त्याची डावी बाजू, कर्वे रस्ता, झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, एरंडवणा परिसर.
दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच. ए. कॉलनी, टिळेकर प्लॉट, भरतनगर, अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदिर परिसर, सुनिता सोसायटी, युको बँक कॉलनी, टँकर पॉइंट, मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकीलनगर, करिष्मा सोसायटी ते वारजे क्षेत्रीय कार्यालय, गिरिजा शंकर, नवसह्याद्री सोसायटी, ताथवडे उद्यान परिसर, निलकमल, युनायटेड वेस्टर्न, अनुरेखा, स्थैर्य, मधूसंचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, रघुकुल, जयशक्ती, सोसायटी परिसर.
चतुःश्रृंगी टाकी परिसर – औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल, सिंघ सोसायटी, औंधगाव परिसर.
