मित्रांसोबत पोहायला गेलेल्या युवकाचा पवना नदीत बुडून मृत्यू

आदेश आणि त्याचे तीन मित्र हे बुधवारी दुपारी गहुंजे येथील स्मशानभूमी शेजारी असणाऱ्या पवना नदीत पोहायला गेले होते. पोहत असताना…

उत्तर प्रदेशमधील कन्नौज जिल्ह्यातील काली नदीत पोहायला गेलेल्या चार मुलांचा बुडून मुत्यू झाला.

पिंपरी-चिंचवडच्या गहुंजे येथील पवना नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. तरुणाला पोहता येत नसावे असा  प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

आदेश मोहन जाधव (वय-१७ रा.शिवराज नगर,रतन गॅस शेजारी, रहाटणी ,पुणे) असं मृत युवकाचं नाव आहे. आदेश आणि त्याचे तीन मित्र हे बुधवारी दुपारी गहुंजे येथील स्मशानभूमी शेजारी असणाऱ्या पवना नदीत पोहायला गेले होते. पोहत असताना पाण्यात बुडून आदेशचा मृत्यू झाला, त्याला नीट पोहता येत नसावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेनंतर आदेश पाण्यात बुडल्याची माहिती त्याच्या मित्रांनी भाऊ कुणाल याला दिली होती. त्यानंतर तो तातडीने घटनास्थळी पोहचला. आदेशला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याला मयत घोषित करण्यात आले.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pune youngster drowned in pavna river

ताज्या बातम्या