Pune ZP Election Results LIVE Updates (पुणे जिल्हा परिषद निवडणूक निकाल): महाराष्ट्रातील यंदाच्या निवडणूक हंगामातील शेवटची निवडणूक जिल्हा परिषदेची ठरली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार राज्य निवडणूक आयोगाने आधी नगरपरिषद-नगरपंचायत, त्यानंतर महानगरपालिका आणि सरतेशेवटी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. विशेष म्हणजे आधी झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये राज्यातील आघाड्या व युतींच्या अगदी उलट चित्र अनेक ठिकाणी दिसलं. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकांमध्येदेखील अनेक ठिकाणी राज्यातील मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिल्याचं दिसून आलं. पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक त्यासाठी अपवाद नव्हती!
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांपैकी फक्त १२ जिल्हा परिषदा व एकूण १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका यंदा घेतल्या जात आहेत. या निवडणुकांसाठी एकीकडे राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीमधील भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष कुठे एकमेकांसोबत तर कुठे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं दिसून आलं. दुसरीकडे विरोधकांचीदेखील काहीशी अशीच स्थिती पाहायला मिळाली.
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ वेळापत्रक (Pune ZP Election Schedule 2026)
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्हा परिषदांसाठी यंदा निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. त्याअंतर्गत पुणे जिल्हा परिषद निवडणूक २०२६ साठी मतदानाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार ही निवडणूक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार होती. मात्र, राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यभरात शोककळा पसरली. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने परिस्थितीचा आढावा घेत निवडणूक प्रक्रियेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल केले.
त्यानुसार, पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडले असून, मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
| निवडणूक टप्पा | तारीख / वेळ |
|---|---|
| सूचना प्रसिद्धी | १६ जानेवारी |
| नामनिर्देशन स्वीकारणे | १६ जानेवारी ते २१ जानेवारी |
| छाननी | २२ जानेवारी २०२६ |
| माघारीची अंतिम मुदत | २७ जानेवारी, दुपारी ३:०० पर्यंत |
| अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप | २७ जानेवारी, दुपारी ३:३० नंतर |
| मतदान | ७ फेब्रुवारी, सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत |
| मतमोजणी | ९ फेब्रुवारी, सकाळी १०:०० पासून |
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वॉर्ड संख्या (Pune Zila Parishad and Panchayat Samiti Wards Count)
पुणे जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे ७३ निवडणूक विभाग आणि १३ पंचायत समित्या आहेत. या जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात एकूण १४६ पंचायत समिती वॉर्ड आहेत.
| माहिती | संख्या |
|---|---|
| जिल्हा परिषद एकूण वॉर्ड | ७३ |
| पंचायत समिती (सीट संख्या) | १३ |
| पंचायत समिती एकूण वॉर्ड | १४६ |
Pune Zila Parishad Election Result 2017 – Party-wise Seats पुणे जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०१७- पक्षनिहाय जागा
२०१७ साली या जिल्हा परिषदेच्या घेण्यात आलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष ४४ जागांसह प्रथम क्रमांकावर होता. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर १३ जागांसह शिवसेना पक्षाची कामगिरी राहिली.
पुणे जिल्हा परिषदेचा विचार केला असता मागील म्हणजेच २०१७ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) पक्षाला विजय मिळाला होता. निवडणुकीनंतर विश्वास उर्फ नाना देवकाटे यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तर उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)चे विवेक वालसे-पाटिल यांनी बाजी मारली होती.
| पक्षाचे नाव | जिंकलेल्या जागा |
|---|---|
| राष्ट्रवादी | ४४ |
| शिवसेना | १३ |
| भाजप | ७ |
| काँग्रेस | ७ |
| इतर | ४ |
| एकूण | ७५ |
पुणे जिल्हा परिषद वॉर्ड निहाय निकाल २०१७ (Pune Zilla Parishad Ward Wise Results 2017)
पुणे जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये एकूण ७३ निवडणूक विभाग असून २०१७ साली तेव्हाच्या राजकीय स्थितीचं प्रतिबिंब या जिल्ह्याच्या निकालांमध्ये पाहायला मिळालं.
| वॉर्ड क्रमांक | विजेत्याचे नाव | विजेत्या पक्षाचे नाव |
|---|---|---|
| ३५ | मंगल नितीन जंगम | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३७ | कल्पना सुभाष जगताप | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४८ | पूनम नानासाहेब दळवी | राष्ट्रीय समाज पक्ष (RSP) |
| ६३ | भरत मल्हारी खैरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३ | शरदराव किसन लेंडे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १ | अंकुश सखाराम आमले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २ | मोहित सुदाम ढमाले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४ | पांडुरंग तुकाराम पवार | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ५ | आशाताई दत्तात्रय बुचके | शिवसेना (SHS) |
| ६ | गुलाब विठ्ठल पारखे | शिवसेना (SHS) |
| ७ | देवराम सखाराम लांडे | शिवसेना (SHS) |
| ८ | रूपा जयंत जगदाळे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ९ | देविदास दत्तात्रय दरेकर | शिवसेना (SHS) |
| १० | तुळशी सचिन भोर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ११ | विवेक प्रतापराव वळसेपाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १२ | अरुणा दत्तात्रय थोरात | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १३ | सुनीता सोनभाऊ गावडे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १४ | राजेंद्र रणजित जगदाळे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १५ | स्वाती दत्तात्रय पाचुंडकर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १६ | सविता एकनाथ बगाटे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १७ | कुसुम धैर्यशील मांढरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १८ | रेखा मंगलदास बांदल | लोकशाही क्रांती आघाडी |
| १९ | सुजाता अशोकराव पवार | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २० | अतुल महादेव देशमुख | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| २१ | तनुजा संदीप घनवट | शिवसेना (SHS) |
| २२ | बाबाजी रामचंद्र काळे | शिवसेना (SHS) |
| २३ | निर्मला सुखदेव पानसरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २४ | दिपाली केशव काळे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २५ | रुपाली श्रीकांत कड | शिवसेना (SHS) |
| २६ | शरद आनंदराव बुटे | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| २७ | शोभा सुदाम कदम | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २८ | नितीन अण्णासाहेब मराठे | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| २९ | बाबुराव आबाजी वायकर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३० | कुसुम ज्ञानेश्वर काशीकर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३१ | अलका गणेश धानिवले | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ३२ | सागर किसन काटकर | शिवसेना (SHS) |
| ३३ | शंकर हिरामण मांडेकर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३४ | अंजली ज्ञानोबा कांबळे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३६ | ज्ञानेश्वर पंढरीनाथ कटके | शिवसेना (SHS) |
| ३८ | कीर्ती अमित कांचन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ३९ | सुनंदा रघुनाथ शेलार | स्वतंत्र |
| ४० | अर्चना प्रवीण कामठे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४१ | दिलीप परशुराम घुले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४२ | वंदना महादेव कोद्रे | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ४३ | सुरेखा शैलेंद्र चौरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४४ | जयश्री सत्यवान भूमकर | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ४५ | जयश्री बाबासाहेब पोकळे | भारतीय जनता पक्ष (BJP) |
| ४६ | अनिता तुकाराम इंगळे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४७ | पूजा नवनाथ पारगे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ४९ | राणी हर्षल शेळके | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ५० | लक्ष्मण बाळकृष्ण सातपुते | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ५१ | वीरधवल कृष्णराव जगदाळे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ५२ | सारिका राजेंद्र पानसरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ५३ | गणेश भिकू कदम | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ५४ | ज्योती राजाराम झेंडे | शिवसेना (SHS) |
| ५५ | दासत्रय मारुती झुरंगे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| ५६ | दिलीप सोपान यादव | शिवसेना (SHS) |
| ५७ | शालिनी शिवाजी पवार | शिवसेना (SHS) |
| ५८ | अमोल उल्हास नलावडे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| ५९ | दिनकर सोनाबा धारपाळे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| ६० | शलाका कुलदीप कोंडे | शिवसेना (SHS) |
| ६१ | विठ्ठल दिनकर आवळे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| ६२ | रणजित शिवाजीराव शिवतारे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ६४ | रोहित राजेंद्र पवार | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ६५ | रोहिणी रविराज तावरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ६६ | विश्वास नारायण देवकाते | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ६७ | प्रमोद भगवानराव काकडे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ६८ | मिनाक्षी किरण तावरे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ६९ | हनुमंत कल्याणराव बंडगर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ७० | प्रवीणकुमार दशरथ माने | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ७१ | अभिजित राजेंद्र तांबिले | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ७२ | भारती मोहन दुधाळ | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| ७३ | वैशाली प्रतापराव पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ७४ | सागर मल्हारी भोसले | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| ७५ | रत्नप्रभा शहाजीराव पाटील | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
पुणे जिल्हा परिषद वॉर्ड निहाय निकाल २०२६ (Pune ZP Ward Wise Election Results 2026)
पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण ७३ जिल्हा परिषद प्रभाग आहेत. तसेच जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांमध्ये एकूण १४६ प्रभागांचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार पुणे जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ९,४२९,४०८ इतकी आहे. २०२६ साली झालेल्या या निवडणुकांमधील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभागांचे सविस्तर निकाल येथे पाहता येतील.
महाराष्ट्रातील महत्वाचे जिल्हा परिषद निवडणुका निकाल २०२६ लाईव्ह अपडेट (Maharashtra Zilla Parishad Election Results 2026)
पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची नावे
| क्रमांक | पंचायत समित्यांची नावे |
|---|---|
| १ | जुन्नर पंचायत समिती |
| २ | आंबेगाव पंचायत समिती |
| ३ | शिरूर पंचायत समिती |
| ४ | खेड पंचायत समिती |
| ५ | मावळ पंचायत समिती |
| ६ | मुळशी पंचायत समिती |
| ७ | हवेली पंचायत समिती |
| ८ | दौंड पंचायत समिती |
| ९ | पुरंदर पंचायत समिती |
| १० | वेल्हे पंचायत समिती |
| ११ | भोर पंचायत समिती |
| १२ | बारामती पंचायत समिती |
| १३ | इंदापूर पंचायत समिती |
महाराष्ट्र जिल्हा परिषद २०२६ निवडणुकीशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न-उत्तरे
प्र. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी झाल्या?
उ. ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडले.
प्र. पुणे जिल्हा परिषदेचे निकाल कधी जाहीर करण्यात आले?
उ. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात आले.
प्र. पुणे जिल्हा परिषदेची रचना कशी आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर किती निवडणूक विभाग आहेत?
उ. पुणे जिल्हा परिषदेत एकूण ७३ जिल्हा परिषद निवडणूक विभाग आहेत. जिल्ह्यात १३ पंचायत समित्या कार्यरत आहेत. या पंचायत समित्यांच्या कार्यक्षेत्रात एकूण १४६ पंचायत समिती निवडणूक विभाग समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, पंचायत समितीच्या निवडणूक विभागांची संख्या जिल्हा परिषद निवडणूक विभागांच्या तुलनेत दुप्पट असते.
प्र. महापौरांची निवड कशी केली जाते?
उ. महापौरांची निवड निवडून आलेल्या नगरसेवकांमधून होते. बहुमत असणाऱ्या पक्षाचे उमेदवार महापौर व उपमहापौर होतात.
प्र. महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत?
उ. महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांमध्ये मिळून ३४ जिल्हा परिषदा आहेत.
प्र. महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी कोण पात्र असतं?
उ. वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे भारतीय नागरीक मतदानासाठी पात्र असतात.
प्र. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
उ. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.
जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम कोण जाहीर करतं?
उ. जिल्हा परिषद कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग जाहीर करतं.
प्र. महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणूक किती वेळा होतात?
उ. जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही दर पाच वर्षांनी होतात.
प्र. जिल्हा परिषद निवडणुकीत कोणी मतदान करू शकतो?
उ. जिल्ह्यातील त्या प्रभागात नोंदणीकृत मतदार म्हणून नोंदणीकृत रहिवासी मतदानासाठी पात्र आहेत.
प्र. जिल्हा परिषद सदस्याची जबाबदारी काय आहे?
उ. जिल्हा परिषद सदस्य स्थानिक विकास प्रकल्प, कल्याणकारी योजना तसेच जिल्ह्यातील शाळा, रुग्णालये आणि ग्रामीण पायाभूत सुविधा यांचे प्रशासन आणि निर्णय घेण्याची जबाबदारी पार पाडतात.
प्र. जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड कशी होते?
उ. वार्ड सदस्य निवडून आल्यावर, ते आपापसांत मतदान करून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करतात.
प्र. जिल्हा परिषद निवडणुका कोण घेते?
उ. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक संस्थांसाठी स्वच्छ आणि स्वतंत्र निवडणुका घेण्यास जबाबदार आहे.
प्र. पंचायत समित्यांची सदस्य संख्या किती असते?
उ. महाराष्ट्रात पंचायत समित्यांची सदस्य संख्या त्या समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांच्या संख्येच्या दुप्पट असते.
प्र. जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान व कमाल किती असू शकते?
उ. कोणत्याही जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान ५० ते कमाल ७५ असू शकते.
प्र. मतदारांना पुणे जिल्हा परिषदेचा निकाल कुठे पाहाता येईल?
उ. मतदारांना पुणे जिल्हा परिषदेचा निकाल निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ व लोकसत्ता डॉट कॉमसारख्या विश्वासार्ह संकेतस्थळांवर पाहाता येईल.
डिस्क्लेमर: या पृष्ठावर नमूद करण्यात आलेली महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकांसाठी निवडणूकविषयक माहिती विविध सार्वजनिक स्रोत, राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत अधिसूचना, माध्यमांतील अहवाल तसेच उपलब्ध आकडेवारीच्या आधारे संकलित करण्यात आली आहे. माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आली असली, तरी कालांतराने आकडे, निकाल किंवा इतर तपशीलांमध्ये बदल होण्याची शक्यता राहते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वाचकांनी संबंधित अधिकृत स्रोतांची पडताळणी करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही निर्णयासाठी संकेतस्थळ किंवा प्रकाशक जबाबदार राहणार नाही.

