Pune ZP Election Results 2026 Winner List : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर आज (९ फेब्रुवारी) या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. या निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेचाही समावेश आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी जवळपास २९९ तर १३ पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ५२८ उमदेवार रिंगणात होते. आज पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? पुणे जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाची सत्ता येणार? या सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Pune ZP and Panchayat Samiti Election Results 2026 LIVE Updates : पुणे जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाची सत्ता येणार?  निकाल जाहीर

20:28 (IST) 9 Feb 2026

दादा... आज हे यश पाहण्यासाठी तुम्ही असायला हवे होतात; आदिती तटकरे भावूक

दादा... आज हे यश पाहण्यासाठी तुम्ही असायला हवे होतात, अशी भावूक प्रतिक्रिया मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. खंबीर नेतृत्व गमावल्यानंतर सैन्याची ताकद टिकवून ठेवणं हे आमच्यासाठी सर्वात मोठं आव्हान होतं. पण जनतेच्या प्रेमामुळे आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे मिळालेला हा विजय आमचं मनोबल वाढवणारा आहे, असे तटकरे म्हणाल्या.

20:08 (IST) 9 Feb 2026

"अजितदादा आज आपल्यात असते तर....", पुणे आणि सांगली जिल्हा परिषदेतील यशानंतर रोहित पवार भावूक

"राज्यातील पुणे आणि सांगली जिल्हा परिषदेसह ३३ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीला सत्ता देऊन मायबाप जनतेने अजितदादांना एकप्रकारे आदरांजली अर्पण केली. तसंच राज्यात निवडून आलेल्यांमध्ये पक्षाचा दुसरा-तिसरा क्रमांक लागतो. अजितदादा आज आपल्यात असते तर अधिक मोठं यश बघायला मिळालं असतं, पण दुर्दैवाने नियतीने त्यांना आपल्यातून हिरावून नेलं. आता निवडून आलेले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व सदस्य अजितदादांच्या विचारांप्रमाणे सामान्य माणसाच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करतील, असा विश्वास आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा!", अशी पोस्ट आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

19:10 (IST) 9 Feb 2026

इंदापुरात मंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुत्र विजय

इंदापुरात बोरी गणातून राष्ट्रवादीचे श्रीराज भरणे विजयी झाले आहेत. श्रीराज मंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुत्र आहेत.

18:58 (IST) 9 Feb 2026

अजित पवारांची ‘राष्ट्रवादी’च पुणे जिल्ह्यात ‘दादा’

दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या 'राष्ट्रवादी'ने बाजी मारली आहे. बारामतीसह अनेक तालुक्यांत विरोधकांचा सुपडा साफ करत पुणे जिल्ह्यावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचेच वर्चस्व सिद्ध झाले आहे. ...अधिक वाचा
18:54 (IST) 9 Feb 2026

'हा विजय स्वर्गीय अजितदादा यांना समर्पित'; आमदार सुनील शेळके

"हा विजय आहे विश्वासाचा, राष्ट्रवादी काँग्रेसवर असलेल्या विश्वासाचा! हा विजय स्वर्गीय अजितदादा यांना समर्पित!", अशी एक्स पोस्ट आमदार सुनील शेळके यांनी केली आहे.

18:05 (IST) 9 Feb 2026

पुणे जिल्हा परिषदेतील विजेत्या उमेदवारांची संपूर्ण यादी

आज पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. आता पुणे जिल्हा परिषदेतील विजेत्या उमेदवारांची संपूर्ण यादी समोर आली आहे.

सविस्तर वाचा

17:39 (IST) 9 Feb 2026

Pune ZP Election Result Updates : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षीय बलाबल काय आहे?

Pune ZP Election Result Updates : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या? जाणून घेऊयात.

पुरंदर तालुका पक्षीय बलाबल काय?

जिल्हा परिषद गट

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) २

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) ०

भाजपा- २

शिवसेना शिंदे - ०

शिवसेना ठाकरे- ०

काँग्रेस -०

पंचायत समिती गण

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) ४

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) ०

भाजपा - २

शिवसेना -(शिंदे) २

शिवसेना (ठाकरे ) ०

काँग्रेस - ०

17:18 (IST) 9 Feb 2026

Pune ZP Election Result Updates : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांनी घेतली भेट

Pune ZP Election Result Updates : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं होतं. त्यानंतर आज (९ फेब्रुवारी) या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. पुणे जिल्हा परिषदेत भाजपाला मोठा धक्का बसला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुणे जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता मिळवली आहे. यानंतर बारामतीत सहयोग सोसायटीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या निवासस्थानी विजयी झालेल्या उमेदवारांनी भेट घेतली आहे. अजित पवार यांच्या फोटोला अभिवादन करून या विजयी उमेदवारांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली.

17:14 (IST) 9 Feb 2026

Pune ZP Election Result Updates : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आंबेगाव तालुक्यातील विजयी उमेदवारांची नावं

Pune ZP Election Result Updates : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं होतं. त्यानंतर आज (९ फेब्रुवारी) या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. जिल्हा परिषद निवडणुकीत आंबेगाव तालुक्यातील विजयी उमेदवारांची नावं जाणून घेऊयात.

1) शीला राजेंद्र लोहेकरे - (राष्ट्रवादी अजित पवार)

2) दरेकर सुवर्णा देविदास - (शिवसेना शिंदे)

3) प्रीती प्रवीण थोरात - (राष्ट्रवादी शरद पवार)

4) विवेक प्रताप वळसे- (राष्ट्रवादी अजित पवार)

5) विष्णू काका हिंगे -(राष्ट्रवादी अजित पवार)

पंचायत समिती : विजयी उमेदवाराची नावे आंबेगाव तालुका

1) श्वेता किरण ढोबळे (राष्ट्रवादी शरद पवार)

2) अंकिता अनिल वाळुंज (राष्ट्रवादी अजित पवार)

3) शिवाजी संपत निघोट (राष्ट्रवादी अजित पवार)

4) निलेश नामदेव टेमकर (राष्ट्रवादी अजित पवार)

5) संजय सिताराम गवारी (राष्ट्रवादी अजित पवार)

6) ज्योती प्रवीण पारधी (राष्ट्रवादी अजित पवार)

7) कैलास काळे (राष्ट्रवादी अजित पवार)

8) संजय कोंडीबा पवळे (राष्ट्रवादी अजित पवार)

9) उषा रमेश कानडे (राष्ट्रवादी अजित पवार)

10) प्रियंका केतन वाघ (राष्ट्रवादी शरद पवार)

16:48 (IST) 9 Feb 2026

Pune ZP Election Result Updates : पुणे जिल्हा परिषदेत भाजपाला मोठा धक्का, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

Pune ZP Election Result Updates : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं होतं. त्यानंतर आज (९ फेब्रुवारी) या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेचाही समावेश होता.

सविस्तर वाचा

16:43 (IST) 9 Feb 2026

Nirmala Nawale: सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या माजी सरपंच, उच्चशिक्षित निर्मला नवले यांचा पंचायत समितीमधून पराभव

Nirmala Nawale Election Result: माजी सरपंच असलेल्या निर्मला नवले यांचा सोशल मीडियावरचा वावर एखाद्या एन्फ्लुएन्सरलाही मागे टाकेल, असा आहे. उच्चशिक्षित असलेल्या निर्मला नवले या रिलच्या माध्यमातून आपली कामे लोकांसमोर घेऊन जात असतात. या तंत्रज्ञानाचे मर्म अचूक समजल्यामुळे अल्पावधितच निर्मला नवले यांचा मोठा चाहता वर्ग सोशल मीडियावर तयार झाला होता. मात्र ही आभासी प्रसिद्धी त्यांना प्रभागात कामाला आली नाही. भाजपाच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला.

सविस्तर वाचा

16:27 (IST) 9 Feb 2026

Pune ZP Election Result : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत कोण विजयी झालं? जाणून घ्या

Pune ZP Election Result Updates : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं होतं. त्यानंतर आज (९ फेब्रुवारी) या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकहाती सत्ता मिळवण्यास यश आलं आहे.

कोणत्या पंचायत समितीत कोण विजयी झालं?

-पंचायत समिती कवठे येमाई आणि टाकळी हाजी गणातही भाजपाचे उमेदवार विजयी

-दिवे गणातून पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित झेंडे, तर गराडे गणातून अर्चना कटके मोठ्या फरकाने विजयी.

-बारामती तालुक्यातील सुपे गणातून पंचायत समितीसाठ भाजपच्या उज्वला पोपट खैरे विजयी.

-पुरंदर – बेलसर माळशिरस गण – माणिक निंबाळकर शिवसेना (शिंदे)

-पुरंदर – माळशिरस गण – माऊली यादव (भाजपा)

-पुरंदर- भिवडी गणातून सायली शिंदे (भाजप)

-पुरंदर – वीर गणातून सुधीर धुमाळ (भाजपा) विजयी

-शिरूर – तळेगाव गणात भाजपाच्या विद्या भुजबळ

-शिरूर – रांजणगाव सांडस गणातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ) पक्षाचे विजय रणसिंग विजयी

16:03 (IST) 9 Feb 2026

Maharashtra ZP Election Panchayat Samiti Election Results 2026: मावळात भाजपचा सुफडासाफ! आमदार सुनील शेळके म्हणाले, भाजपने यापुढे..

Maharashtra ZP Election Panchayat Samiti Election Results 2026: मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाचही गटामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) पक्षाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. मावळ पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. दहापैकी दहाही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत. जिल्हा परिषेद आणि पंचायत समितीमध्ये भाजपचा एकही सदस्य निवडून आला नसून सुफडासाफ झाला आहे. त्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर तोफ डागली आहे.

सविस्तर वाचा

15:55 (IST) 9 Feb 2026

Zilla Parishad Election Result LIVE: जिल्हा परिषद-पंचायत समिती निकाल जाहीर; कुणी मारली बाजी, कुणाचा झाला पराभव?

Zilla Parishad Election Result LIVE: महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निकालांची अपडेट जाणून घेऊया.

सविस्तर वाचा

15:54 (IST) 9 Feb 2026

Maharashtra ZP Election Results 2026: मावळात भाजपचा सुफडासाफ! आमदार सुनील शेळके म्हणाले, भाजपने यापुढे..

Maharashtra Zilla Parishad Panchayat Election Results 2026: पुणे जिल्हा परिषेद आणि पंचायत समितीमध्ये भाजपचा एकही सदस्य निवडून आला नसून सुफडासाफ झाला आहे. त्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर तोफ डागली आहे. ...अधिक वाचा
15:42 (IST) 9 Feb 2026

Pune ZP Winner List : पुणे जिल्हा परिषद निवडणूक निकाल, वाचा विजेत्या उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

Pune ZP Election Winner List 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची मतमोजणी आज सुरू आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी जवळपास २९९ तर १३ पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ५२८ उमदेवार रिंगणात होते. आज पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वाचा

15:28 (IST) 9 Feb 2026

Pune ZP Election Result Live Updates : मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची घौडदौंड कायम, पंचायत समितीवर एकहाती सत्ता

Pune ZP Election Result Live Updates : मावळ तालुक्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने घौडदौंड कायम ठेवली आहे. मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाचही गटामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) पक्षाच्या उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली आहे. पंचायत समितीमधील दहाही गणांमधील उमेदवार विजयाच्या समिप असून घोषणेची औपचारिकता बाकी आहे.

सविस्तर वाचा

15:15 (IST) 9 Feb 2026

Pune ZP Election Result : पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता, बहुमताचा आकडा केला पार

Pune ZP Election Result Updates : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं होतं. त्यानंतर आज (९ फेब्रुवारी) या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेचाही समावेश होता.

सविस्तर वाचा

15:06 (IST) 9 Feb 2026

Pune ZP Election Result Live Updates : खेडमध्ये मशाल पेटली, आठ गणांमधील ५ जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादीचा तीन जागांवर विजय

Pune ZP Election Result Live Updates : खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आठ गणांमधील पाच जागा जिंकत शिवसेना (ठाकरे) पक्षाने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला तीन जागांवर विजय मिळाला आहे.

गणनिहाय विजयी उमेदवार कोणते?

नाणेकरवाडी-म्हाळुंगे -गणेश बोत्रे (राष्ट्रवादी काँग्रेस)

आळंदी ग्रामीण-कुरुळी - विनया मुंगसे (शिवसेना-ठाकरे)

मेदनकरवाडी-काळुस - गणेश आरगडे (शिवसेना-ठाकरे)

पिंपळगावतर्फे मरकळ - विजयसिंह शिंदे (शिवसेना-ठाकरे)

रेटवडी-वाफगाव-दिप्ती भोगाडे-(शिवसेना-ठाकरे)

वाडा-वाशेरे-समीर सुपे -(राष्ट्रवादी काँग्रेस)

पाईट-आंबेठणा-सुनीता बुट्टे-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

तनुजा घनवट -(शिवसेना-ठाकरे)

15:03 (IST) 9 Feb 2026

Pune ZP Election Result Live Updates : विद्या भुजबळ व रणसिंग विजयी

Pune ZP Election Result Live Updates : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली आहे. दरम्यान, तळेगाव गणात भाजपाच्या विद्या भुजबळ व रांजणगाव सांडस गणातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विजय रणसिंग विजयी झाले आहेत.

15:01 (IST) 9 Feb 2026

Pune ZP Election Result Live Updates : रांजणगाव सांडस तळेगाव जिल्हा परिषद गटात दीपाली गव्हाणे विजयी

Pune ZP Election Result Live Updates : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली आहे. दरम्यान, रांजणगाव सांडस तळेगाव जिल्हा परिषद गटात दीपाली गव्हाणे विजयी झाल्या आहेत. दिपाली गव्हाणे या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्षाचे आमदार बापू पठारे यांच्या कन्या आहेत. दिपाली गव्हाणे यांनी काँग्रेसच्या माजी सभापती रेखा मंगलदास बांदल यांचा पराभव केला आहे.

14:59 (IST) 9 Feb 2026

Maval Panchayat Samiti Election Result: मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची घौडदौंड कायम, पंचायत समितीवर एकहाती सत्ता

मावळ पंचायत समितीवर सलग २० वर्षांपासून असलेल्या सत्तेला राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुंग लावला आहे. ...सविस्तर बातमी
14:49 (IST) 9 Feb 2026

गेल्या निवडणुकांचा कल काय होता?

पुणे जिल्हा परिषदेत २००७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट वर्चस्व राखले होते. ७५ जागांपैकी ४५ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकत बहुमत मिळवले होते. काँग्रेसला १३, शिवसेनेला ६, भाजपला केवळ २, जनता दलाला २, तर ७ अपक्ष सदस्य निवडून आले होते. २०१२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागा जिंकत पुन्हा एकदा आघाडी घेतली. काँग्रेसला या निवडणुकीत ११ जागा मिळाल्या, तर शिवसेनेने १३ जागांवर विजय मिळवला होता. भाजपची कामगिरी मात्र तुलनेने मर्यादित राहिली होती, केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. तर २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा कायम राहिला, त्यांच्या जागांची संख्या ४३ एवढी झाली. काँग्रेसने ७ जागांपर्यंत मजल मारता आली. शिवसेनेला १४ जागा मिळाल्या, तर भाजपची कामगिरी ७ जागांवर पोहोचली. यावर्षी जिल्हा परिषदेच्या गट कमी होऊन ७३ झाले आहेत. कोण किती जागा मिळवणार हे ७ फेब्रुवारीला स्पष्ट होईल. त्यापूर्वी सर्वच पक्षांची सध्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

पुणे जिल्हा परिषदेतील २०१७ मधील पक्षीय बलाबल कसं होतं?

राष्ट्रवादी काँग्रेस - ४२

काँग्रेस -७

शिवसेना - १४

भाजप - ७

लोकशाही क्रांती दल - १

रासप - १

अपक्ष - २

14:39 (IST) 9 Feb 2026

Pune ZP Election Result Updates : पुणे जिल्हा परिषदेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एकहाती सत्ता, बहुमताचा आकडा केला पार

Pune ZP Election Result Updates : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. दरम्यान, आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तब्बल ४० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवत ३७ चा बहुमताचा आकडा पार केला आहे.

सविस्तर वाचा

14:21 (IST) 9 Feb 2026

Pune ZP Election Result Live Updates : पुणे जिल्हा परिषदेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एकहाती सत्ता, तब्बल ४० पेक्षा जास्त जागांवर विजय

Pune ZP Election Result Live Updates : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तब्बल ४० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवत ३७ चा बहुमताचा आकडा पार केला आहे.

पुणे जिल्हा परिषद निकाल कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

भाजप- ८

शिवसेना- ४

राष्ट्रवादी (अजित पवार)- ३९

राष्ट्रवादी शरद पवार गट - १

ठाकरे गट- ३

काँग्रेस-०

अपक्ष ०

14:10 (IST) 9 Feb 2026

पुणे जिल्हा परिषदेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यांच्या पक्षाला ७३ पैकी ३९ जागांवर विजय मिळाल्या आहेत.

13:47 (IST) 9 Feb 2026

Pune ZP Election Result Live Updates : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत राष्ट्रवादीची मोठी बाजी

Pune ZP Election Result Live Updates : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी बाजी मारली आहे. तसेच दिवे गणातून पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित झेंडे, तर गराडे गणातून अर्चना कटके मोठ्या फरकाने विजयी. बारामती तालुक्यातील सुपे गणातून पंचायत समितीसाठ भाजपच्या उज्वला पोपट खैरे विजयी.

13:45 (IST) 9 Feb 2026

Pune ZP Election Result Live Updates : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादीची मोठी बाजी

Pune ZP Election Result Live Updates : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी बाजी मारली आहे.

जुन्नर डिंगोरे उदापूर गट सोनाबाई दाभाडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

जुन्नर- ओतूर धालेवाडी गट – छाया तांबे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

जुन्नक – आळे पिंपळवंडी गट – मंगेश काकडे शिवसेना (शिंदे)

जुन्नक बेल्हे राजुरी गट – स्मिता कणसे शिवसेना ( शिंदे )

जुन्नर – बोरी खुर्द गट- कल्पना काळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

जुन्नर- नारायणगाव वारूळवाडी गट – नेहा पाटे शिवसेना (शिंदे)

जुन्नर – सावरगाव कुसुर- गुलाब पारखे शिवसेना (ठाकरे)

जुन्नर- बारव तांबे गट -मोनाली लांडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

13:42 (IST) 9 Feb 2026

Pune ZP Election Result Live Updates : पुणे जिल्हा परिषदेच्या इंदापूर-बिजवडी गटातून राष्ट्रवादीच्या हर्षदा जाधव विजयी

Pune ZP Election Result Live Updates : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या इंदापूर-बिजवडी गटातून राष्ट्रवादीच्या हर्षदा जाधव विजयी झाल्या आहेत.

13:41 (IST) 9 Feb 2026

Pune ZP Election Result Live Updates : शिक्रापूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीच्या मोनिका हरगुडे विजयी

Pune ZP Election Result Live Updates : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी आघाडी घेतली आहे. तसेच शिक्रापूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीच्या मोनिका हरगुडे विजयी झाल्या आहेत.

Pune ZP and Election Results 2026 LIVE

पुणे जिल्हा परिषदेत कोणत्या पक्षाची सत्ता येणार? आज निकाल जाहीर होणार, (फोटो-संग्रहित छायाचित्र)