पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रमाला तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भातील सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम नंतर कळविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक जिल्हा समन्वय अधिकारी संजय तेली यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम देण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिकेमध्ये राज्य शासनाने दाखल केलेल्या अर्जावर मंगळवारी (१२ जुलै) सुनावणी झाली असून पुढील सुनावणी एका आठवड्यानंतर होणार आहे. त्यामुळे आरक्षण सोडत कार्यक्रमास तूर्त स्थगिती देण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगातर्फे कळविण्यात आले आहे. त्यानुसार ही स्थगिती देण्यात आल्याचेही तेली यांनी सांगितले.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
10th exam maharashtra
राज्यात दहावीची परीक्षा सुरू, पहिल्या दिवशी कॉपी प्रकरणे किती?
pm Modi Yavatmal
पंतप्रधानांची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांनी कशासाठी बजावली नोटीस?
Chahal, Bhide to be transferred after ECI orders
चहल, भिडे यांची बदली अटळ; राज्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली