Pune ZP Election Winner List 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची मतमोजणी आज सुरू आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी जवळपास २९९ तर १३ पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ५२८ उमदेवार रिंगणात होते. आज पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने एकहाती विजय मिळवला आहे. पक्षाने बहुमतासाठी आवश्यक असलेला ३७ चा आकडा पार केला आहे. पुणे जिल्ह्यात ५१ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.

पुणे जिल्हा परिषद निकाल

एकुण जागा – ७३

भाजप- १०
शिवसेना (शिंदे) – ५
राष्ट्रवादी (अजित पवार) – ५१
राष्ट्रवादी (शरद पवार) – १
शिवसेना (ठाकरे) – ६
काँग्रेस-०
अपक्ष ०

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत आत्तापर्यंत विजयी झालेले उमेदवार

तालुका- गट – विजयी उमेदवार

पुणे जिल्हा परिषद (२०२५-३०) निवडणुकीतील विजयी उमेदवारांची अद्ययावत यादी खालीलप्रमाणे आहे:

१. जुन्नर तालुका
डिंगोरे: सोनाबाई दाभाडे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

ओतुर: छाया तांबे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

आळे: मंगेश काकडे (शिवसेना – शिंदे)

राजुरी: स्मिता कणसे (शिवसेना – शिंदे)

बोरी बु.: कल्पना काळे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

नारायणगाव: नेहा पाटे (शिवसेना – शिंदे)

सावरगाव: गुलाबराव पारखे (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)

बारव: मोनाली लांडे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

२. आंबेगाव तालुका
शिनोली: शिला लोहोकरे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

घोडेगाव: सुवर्णा देवीदास दरेकर (शिवसेना – शिंदे)

कळंब: प्रिती थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार)

पारगाव तर्फे अवसरी बु.: विवेक वळसे-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

अवसरी बु.: विष्णूकाका हिंगे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

३. शिरुर तालुका
कवठे यमाई: राजेंद्र गावडे (भाजपा)

न्हावरा: वृषाली बबन वाळके (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

रांजणगाव गणपती: स्वातीताई पाचुंदकर (भाजपा)

पाबळ: प्रफुल्ल शिवले (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

शिक्रापूर: मोनिका हरगुडे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

तळेगाव ढमढेरे: दिपाली गव्हाणे (भाजपा)

मांडवगण फराटा: सुजाता पवार (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

४. खेड तालुका
वाडा: समीर काळूराम सुपे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

कडूस: तनुजा घनवट (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)

रेटवडी: दिप्ती भोगाडे (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)

पिंपळगाव तर्फे खेड: विजयसिंह शिंदे (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)

मेदनकरवाडी: गणेश अरगडे (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)

पाईट: सुनिता बुट्टेपाटील (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

नाणेकरवाडी: गणेश बोत्रे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

कुरळी: विनया मुंगसे (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)

५. मावळ तालुका
टाकवे बु.: अनंता पावसे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

इंदूरी: पल्लवी दाभाडे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

खडकाळे: दिपाली हुलावळे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

कुसगाव बु.: संतोष राऊत (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

सोमाटणे: मनिषा मुन्हे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

६. मुळशी तालुका
पौड: मिलिंद वाळंज (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

हिंजवडी: शिवाजी बुचडे (भाजपा)

पिरंगुट: शांताराम इंगवले (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

७. हवेली तालुका
पेरणे: पै. किरण साकोरे (भाजपा)

कोरेगाव मुळ: सुरेखा हरगुडे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

उरुळीकांचन: जितेंद्र बढेकर (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

८. दौंड तालुका
राहू: सागर शेलार (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

वरवंड: गायत्री खळदकर (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

गोपाळवाडी: साहेबराव पोळ (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

खडकी: वीरधवल जगदाळे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

पाटस: अनुराधा शितोळे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

बोरीपार्धी: तुषार रमेश थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

९. पुरंदर तालुका
गराडे: रुपाली झेंडे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

बेलसर: अजय इंगळे (भाजपा)

वीर: हरिभाऊ लोळे (भाजपा)

निरा शिवतक्रार: प्राजक्ता दुर्गाडे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

१०. वेल्हे तालुका
विंझर: अमोल नलावडे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

वेल्हे बु.: तानाजी मांगडे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

११. भोर तालुका
वेळू: पोपटराव सुके (भाजपा)

भोंगवली: विक्रम खुटवड (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

भोलावडे: प्रविण जगदाळे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

१२. बारामती तालुका
सुपा: पल्लवी खेत्रे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

गुणवडी: शुभांगी कचेर शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

पणदरे: मंगेश जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

वडगाव निंबाळकर: रोहिणी कदम (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

निबूत: करण खलाटे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

निरावागज: शिवानी देवकाते (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

१३. इंदापूर तालुका
भिगवण: मेघना तुकाराम बंडगर (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

पळसदेव : हर्षदा दिपक जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

निमगाव केतकी: सोनाली तुषार जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार)

पंचायत समिती निवडणूक विजयी उमेदवार

पंचायत समिती कवठे येमाई आणि टाकळी हाजी गणातही भाजपाचे उमेदवार विजयी

दिवे गणातून पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित झेंडे, तर गराडे गणातून अर्चना कटके मोठ्या फरकाने विजयी.

बारामती तालुक्यातील सुपे गणातून पंचायत समितीसाठ भाजपच्या उज्वला पोपट खैरे विजयी.

पुरंदर – बेलसर माळशिरस गण – माणिक निंबाळकर शिवसेना (शिंदे)

पुरंदर – माळशिरस गण – माऊली यादव (भाजपा)

पुरंदर- भिवडी गणातून सायली शिंदे (भाजप)

पुरंदर – वीर गणातून सुधीर धुमाळ (भाजपा) विजयी

शिरूर – तळेगाव गणात भाजपाच्या विद्या भुजबळ

शिरूर – रांजणगाव सांडस गणातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ) पक्षाचे विजय रणसिंग विजयी