पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा, यासाठी पावसाळापूर्व कामे करण्याची प्रक्रिया यंदा लवकर सुरू करण्यात आली असली तरी या प्रकारची कामे संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. येत्या पंधरा जून पर्यंत कामे पूर्ण करण्याची सूचना महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी केली आहे. पावसाळा पूर्व करावयाची कामे पन्नास टक्के पूर्ण झाली आहेत, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला असला तरी कामांचा संथ वेग पहाता पावसाळ्यापूर्वी कामे होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरवर्षी पावसाळापूर्व कामाअंतर्गत शहरातील नाले, ओढे, कल्व्हर्ट, पावसाळी वाहिन्या आणि गटारांची स्वच्छता महापालिकेकडून केली जाते. त्यासाठी क्षेत्रीय स्तरावर निविदा मागविली जाते. मात्र कामे पावसाळ्यापूर्वी होत नसल्याने आणि ती घाईगडबडीत होत असल्याने निकृष्ट कामांचा दर्जा सातत्याने पुढे आला होता. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्याने प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे यंदा नालेसफाई आणि पावसाळापूर्व कामे लवकर पूर्ण करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार निविदा प्रक्रियाही तातडीने पूर्ण करून मे अखेर पर्यंत कामे पूर्ण करण्यात येतील, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जाहीर केले होते. मात्र कामांचा वेग पहाता ती वेळेत पूर्ण होण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Question marks cleaning completion works before monsoon administration municipal corporation print news amy
First published on: 19-05-2022 at 15:18 IST