scorecardresearch

चिंचवडमधील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे सर्वांत श्रीमंत! ‘इतकी’ आहे मालमत्ता

राहुल कलाटे हे वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून मालमत्तेविषयी स्पष्ट झाली आहे.

rahul kalate
चिंचवडमधील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे सर्वात श्रीमंत!

पुणे : शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले राहुल कलाटे हे तब्बल ६१ कोटींचे धनी आहेत. त्यांच्यावर एक कोटी दहा लाख सात हजार २४८ रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून ही बाब स्पष्ट झाली आहे.

राहुल कलाटे हे वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. कलाटे कुटुंबीयांची जंगम मालमत्ता एक कोटी ४० लाख २० हजार ५९३ आहे. कलाटे यांची स्थावर मालमत्ता ६० कोटी तीन लाख ७६ हजार ३१९ रुपये आहे, तर जंगम आणि स्थावर मालमत्ता ६१ कोटी ४३ लाख ९६ हजार ९१२ रुपयांची आहे. कलाटे यांच्यावर एक कोटी दहा लाख सात हजार २४८ रुपयांचे कर्ज आहे. कलाटे यांनी स्वत:चा शेती उत्पन्न आणि व्यापार हा उत्पन्नाचा स्त्रोत दाखविला असून त्यांची पत्नी गृहिणी आहे.

हेही वाचा – बिगबॉस फेम अभिजित बिचकुले ‘इतक्या’ संपत्तीचे मालक, कसब्यातून उमेदवारी अर्ज दाखल

हेही वाच – विश्लेषण: कसबा कुणाचे, रासने की धंगेकरांचे? ब्राह्मण उमेदवारांना खरोखर डावलले का?

कलाटे यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील खेड, मुळशी तालुक्यांत शेतजमिनी आहेत, तर रहाटणी, वाकड येथे सदनिका आहेत. कलाटे यांच्याकडे ९२ हजार ६४० रुपये, तर त्यांच्या पत्नीकडे ५३ हजार ७५० रुपये रोख रक्कम आहे. कलाटे यांच्याकडे १५ तोळे सोने, तर त्यांच्या पत्नीकडे ५२ तोळे दोन, दोन किलो चांदी आहे. कलाटे यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कलाटे यांनी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५६ लाख ७३ हजार ९४०, तर त्यांच्या पत्नीचे पाच लाख ६६ हजार ३३० रुपये उत्पन्न दाखविले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 10:28 IST